लाईव्ह मॅच दरम्यान कबड्डी खेळाडूचा मृत्यू.

Homeताज्या बातम्याव्हिडीओ

लाईव्ह मॅच दरम्यान कबड्डी खेळाडूचा मृत्यू.

खेळाडूचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा अंदाज

तामिळनाडू प्रतिनिधी - तामिळनाडू(Tamil Nadu) च्या पनरुती(Panaruti) जवळ मणदिकुप्पम(Manadikuppam) गावात एका कबड्डी खेळाडूचा लाईव्ह

गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार अनुराधा पौडवाल यांना प्रदान
कुमठा खुर्द येथे बसच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू
स्वानंद सार्वजनिक वाचनालयात क्रांती दिन व माझी माती माझा देश अभियान अंतर्गत शपथ घेऊन ग्रंथप्रदर्शन संपन्न 

तामिळनाडू प्रतिनिधी – तामिळनाडू(Tamil Nadu) च्या पनरुती(Panaruti) जवळ मणदिकुप्पम(Manadikuppam) गावात एका कबड्डी खेळाडूचा लाईव्ह मॅचदरम्यान मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. डिस्ट्रिक्ट लेव्हल(District Level) मॅचवेळी या खेळाडूचं निधन झालं, पण सगळं प्रकरण काल समोर आलं आहे. मॅच सुरू असताना विमलराज(Vimal Raj) च्या रेडची वेळ आली तेव्हा तो विरोधी गटात आपला दावा खेळायला गेला, तेव्हा विरोधी टीमच्या खेळाडूंनी विमलला घेरलं आणि पाडलं. एका खेळाडूचा पाय विमलच्या छातीवर पडला, पण त्याने आपले 2 पॉईंट्स घेतले. पॉईंट्स घेतल्यानंतर विमल मग उठलाच नाही. साथीदारांनी विमलला हॉस्पिटलमध्ये नेलं, पण तिकडे डॉक्टरांनी विमलला मृत घोषित केलं. विमलचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. विमलचा कबड्डी खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

COMMENTS