पुणे : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात कडबनवाडीमध्ये शिकाऊ विमान कोसळल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात महिला पायलट किरकोळ जखमी झाली आहे.तांत्रि
पुणे : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात कडबनवाडीमध्ये शिकाऊ विमान कोसळल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात महिला पायलट किरकोळ जखमी झाली आहे.तांत्रिक बिघाडामुळे हे विमान कोसळल्याचा अंदाज आहे. स्थानिकांच्या मदतीने या महिला पायलटवर उपचार करण्यात आले असून, गंभीर दुखापत नसल्याची माहिती समोर येत आहे. या विमानाने आज सकाळी बारामतीहून उड्डान केले होते. दरम्यान विमान इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी परिसरात आले असता अचानक कोसळले. विमान कशामुळे पडले याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे विमान कोसळल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेत सुदैवाने पायलट बचावली आहे. मात्र विमानाचे प्रचंड नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक तरुणांनी घटनास्थळी धाव घेत पायलटला सुरक्षित विमानातून बाहेर काढले.
दरम्यान विमान शेतात कोसळल्यानंतर मोठा आवाज झाला. हा आवाज ऐकून शेजारीच असलेल्या पोंदकुले वस्तीतील तरुणांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. घटनास्थळी पोहोचले असता त्यांना विमानाचा अपघात झाल्याचे आढळून आले. त्यानंतर या तरुणांनी घटनास्थळी तातडीने बचावकार्य राबवत महिला पायलटची विमानातून सुखरूप सुटका केली. या घटनेमध्ये महिला पायलट ही किरकोळ जखमी झाली आहे. तर विमानाचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. विमान अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आले नसले तरी देखील तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.
COMMENTS