भरताच्या विरोधात अपप्रचार करणारी 747 संकेतस्थळे बंद

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भरताच्या विरोधात अपप्रचार करणारी 747 संकेतस्थळे बंद

नवी दिल्ली : केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 2021-22 या वर्षात भारताच्या विरोधात अपप्रचार करणारी संकेतस्थळे आणि युट्यूब चॅनल्स बंद केले आहेत.

तब्बल 42 तोळे सोने हस्तगत…सतरा घरफोड्या उघडकीस
एकरकमी एफआरपीसाठी कारखान्यावर मोटसायकल रॅली
Alandi : मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा धाडसी निर्णय – अ‍ॅड.तापकीर

नवी दिल्ली : केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 2021-22 या वर्षात भारताच्या विरोधात अपप्रचार करणारी संकेतस्थळे आणि युट्यूब चॅनल्स बंद केले आहेत. गेल्या वर्षभरात 747 संकेतस्थळे आणि 94 वाहिन्यांलक कठोर कारवाई केल्याची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी राज्यसभेत दिली.
यासंदर्भात राज्यसभेत विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना अनुराग ठाकूर म्हणाले की. गेल्या वर्षभरात 94 यू ट्यूब वाहिन्या, 19 समाज माध्यम खाती आणि 747 यूआरएल अर्थात संकेतस्थळे यांच्याविरुध्द कारवाई करत बंद करण्यात आली आहेत. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 मधील विभाग 69 अ अन्वये ही कारवाई करण्यात आली. इंटरनेटवर खोट्या बातम्या पसरवून तसेच अपप्रचाराचा प्रसार करून देशाच्या सार्वभौमत्वाला बाधा येईल अशी कामे करणार्‍या संस्थांविरुद्ध केंद्र सरकारने कठोरपणे पावले उचलली आहेत.

COMMENTS