Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मिरज तालुक्यात बोगस आयबी अधिकार्‍यास अटक

मिरज / प्रतिनिधी : आयबीमध्ये नोकरी लावण्याच्या आमिषाने तिघांना पाच लाखांचा गंडा घालणार्‍या अभिषेक राजेंद्र वैद्य (रा. आरग, ता. मिरज) या बोगस आयबी

खोडशीजवळ इनोव्हाची रिक्षाला जोराची धडक : गोटेतील 1 ठार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती; राज्य निवडणूक आयोगाचा महत्वपूर्ण निर्णय
वारकर्‍यांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी : पालकमंत्री

मिरज / प्रतिनिधी : आयबीमध्ये नोकरी लावण्याच्या आमिषाने तिघांना पाच लाखांचा गंडा घालणार्‍या अभिषेक राजेंद्र वैद्य (रा. आरग, ता. मिरज) या बोगस आयबी अधिकार्‍याच्या मुसक्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आवळल्या.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुरेश सूर्यवंशी (रा. बाभळगाव, जि. लातूर) यांचा पुण्यातील हिंजवडी येथे टूर्स अँड ट्रॅव्हलसचा व्यवसाय आहे. सूर्यवंशी आणि संशयित अभिषेक वैद्य यांची पुण्यातील हिंजवडीमध्ये कार चालवत असताना ओळख झाली होती. त्यावेळी वैद्य याने सूर्यवंशी यांना आपण आयबीमध्ये अधिकारी असल्याचे सांगितले होते. त्यानंतर वैद्य याने सूर्यवंशी यांना इंजिनिअरिंग झालेल्यांसाठी ‘आयबी’मध्ये जागा निघाल्या आहेत. तेथे नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. शेअर मार्केट आणि बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केल्यास आपला फायदा होईल, असे सांगितले. त्यानुसार ‘आयबी’मध्ये नोकरी आणि गुंतवणुकीच्या आमिषाने वैद्य याने सूर्यवंशी यांच्याकडून पुणे आणि आरग येथे 3 लाख 50 हजार रुपये घेतले होते. त्यानंतर कोणतीही शंका येऊ नये यासाठी वैद्य याने ‘आयबी’मध्ये नोकरी लागल्याबाबतचे वेगवेगळे बनावट ई-मेल पाठवून नोकरी लावल्याचा भास निर्माण केला. तसेच अमित पडसाळगे आणि संतोष दाहाळे या दोघांना देखील ‘आयबी’मध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी वैद्य याने प्रत्येकी 75 हजार रुपये, असे 1 लाख 50 हजार घेतले. ती रक्कम सूर्यवंशी यांच्या खात्यावर पाठविण्यास सांगितले. त्यानंतर सूर्यवंशी यांच्या खात्यावरील तीदेखील रक्कम वैद्य याने काढून घेतली.
‘आयबी’मध्ये नोकरी लागण्याच्या आशेपोटी तिघांनी वैद्य याला 5 लाख रुपये दिले होते. परंतू तिघांना ‘आयबी’मध्ये कोणत्याही प्रकारची नोकरी लागली नव्हती. संबंधित तिघांनी याबाबत वैद्य याच्याकडे वारंवार विचारणा केली. परंतू वैद्य यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सुरेश सूर्यवंशी यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या गुन्ह्यांच्या तपासाठी मिरज ग्रामीण आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक तपास करत होते. त्यावेळी बोगस आयबी अधिकारी संशयित अभिषेक वैद्य हा आरग येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने छापा टाकून त्याला अटक केली आहे.

COMMENTS