नगरच्या चास शिवारात…विखुरलेला मृतदेह

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरच्या चास शिवारात…विखुरलेला मृतदेह

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर-पुणे महामार्गावरील नगर तालुक्यातील वरकड-चास शिवारातील एका मोकळ्या जागेत विखुरलेल्या अवस्थेत मृतदेह शनिवारी आढळून आल्याने खळबळ

श्री साईबाबा संस्थान अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा
केंद्राने लावले कांदा निर्यातीवर 40 टक्के निर्यात शुल्क
भाळवणीत अवैध दारूसह 22 लाखाचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर-पुणे महामार्गावरील नगर तालुक्यातील वरकड-चास शिवारातील एका मोकळ्या जागेत विखुरलेल्या अवस्थेत मृतदेह शनिवारी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. परिसरात जवळच महिलेचे कपडे, मंगळसूत्र आढळून आल्याने संबंधित मृतदेह महिलेचा असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मृतदेहाचे तुकडे इतरत्र विखुरलेले असल्याने व काही प्राण्यांनी या मृतदेहाचे लचके तोडलेले असल्याने अनेक दिवसांपासून हा मृतदेह त्या जागेत पडलेला असण्याची शक्यता आहे. मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही.
नगर-पुणे महामार्गापासून सुमारे तीन किलोमीटर आतील डोंगराळ भागात साहेबराव लक्ष्मण गावखरे यांच्या शेतातील सुमारे 25 ते 30 गुंठे जागेत मृतदेह विखुरलेल्या अवस्थेत असल्याची माहिती तेथील पोलिस पाटील रमेश मुरलीधर रासकर यांनी शनिवारी सकाळी पोलिसांना दिली. ही माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलिस उपनिरीक्षक युवराज चव्हाण, संदीप ढाकणे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. नगर ग्रामीण विभागाचे पोलिस उपअधीक्षक अजित पाटील यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली. हा मृतदेह 25 ते 30 गुंठे मोकळ्या जागेत विखुरलेल्या अवस्थेत आढळून आला तसेच जवळच महिलेचे कपडे, केस, मंगळसूत्र, डोक्याची कवटी पोलिसांना आढळून आली. सुमारे 30 ते 35 वर्षे वयाचा हा मृतदेह असावा. मृतदेहाच्या तुकड्यांचे प्राण्यांनी लचके तोडलेले असल्याने अनेक दिवसांपासून हा मृतदेह त्या जागी पडलेला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. दरम्यान, हा प्रकार घातपात असण्याचीही शक्यता आहे. मात्र, अद्याप याबाबत काहीही स्पष्ट झालेले नाही. मृतदेहाची ओळखही अद्याप पटलेली नाही. मृतदेहाचे तुकडे उत्तरीय तपासणीसाठी रवाना करण्यात आले आहेत. याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक संदीप ढाकणे करीत आहेत.

COMMENTS