तरुणांचा हैदोस; दोन गटात तुफान हाणामारी.

Homeताज्या बातम्याशहरं

तरुणांचा हैदोस; दोन गटात तुफान हाणामारी.

दोन गटात तुफान हाणामारी .

पुणे प्रतिनिधी-   पुण्यात जोंधळे चौकात(Jondhale Chowk) पूर्व वैमनस्यातून दोन गटात तुफान हाणामारी झाली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसां(Vishram Bag

भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्ध भडकणार ?
नाशिकमध्ये दाम्पत्याने आपल्या मुलीसह संपवले जीवन
चांद्रयान-३ चं प्रेक्षपण जुलै महिन्यात होणार ?

पुणे प्रतिनिधी-  

पुण्यात जोंधळे चौकात(Jondhale Chowk) पूर्व वैमनस्यातून दोन गटात तुफान हाणामारी झाली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसां(Vishram Bagh Police) नी ७ जणांना ताब्यात घेतले असून इतरांचा शोध सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टिळक रस्त्यावर दोन गटात अचानक हाणामारीला सुरुवात झाली. चार – पाच तरुण एकाला बेदम मारहाण करताना व्हिडिओमध्ये दिसून आले आहे. त्यामधील एक तरुण हातात दगड घेऊन दहशत देखील निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. तसेच एक युवती फोनवर बोलत त्यांच्यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहे. पोलिसांना ही घटना कळताच ते घटनास्थळी दाखल झाले आहेत. हे तरुण सिंहगड(Sinhagad) रस्त्यावरून आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. तसेच या घटनेत एक पोलिसही जखमी झाला आहे. पुढील तपास विश्रामबाग पोलीस(Vishram Bagh Police) करत आहेत.

COMMENTS