मानोरीत भर दिवसा बिबट्याचा धुमाकुळ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मानोरीत भर दिवसा बिबट्याचा धुमाकुळ

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी राहुरी तालुक्यातील मानोरीत गेल्या दोन दिवसापासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. भर दुपारी मेंढ्यांच्या कळपावर या बिबट्या

राहुरी तालुक्यातील 19 ग्रामपंचायतींवर महिलाराज
अबिटखिंड येथील 200 विद्यार्थांना शालेय साहित्याचे मोफत वाटप
कुपोषण मुक्तीसाठी पोषण आहार चळवळ यशस्वी करा : मनोज ससे

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी राहुरी तालुक्यातील मानोरीत गेल्या दोन दिवसापासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. भर दुपारी मेंढ्यांच्या कळपावर या बिबट्याने हल्ला चळवळ एक मेंढी ठार केल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घाबरहाटीचे वातावरण पसरले आहे.    
       शनिवारी रात्रीच्या दरम्यान दूध घालायला चाललेल्या शेतकऱ्याला हा बिबट्या निदर्शनास पडला होता. त्यामुळे सदर शेतकऱ्याची चांगलीच भांबेरी उडाली घाबरलेल्या अवस्थेत या शेतकऱ्याने सदर ठिकाणावरून पळ काढला.अनेक रानं मोकळे झाल्यामुळे हा बिबट्या अनेकांच्या निदर्शनास येत आहे. तर रविवारी भर दुपारी जबाजी बाचकर या मेंढपाळाच्या कळपावर बिबट्याने हल्ला चढवला आणि एक मेंढी उसामध्ये ओढत नेत ती फस्त केली आहे. सदर शेतकऱ्यांच्या मदतीला काही शेतकरी धावून आल्याने या बिबट्याने उसामध्ये धूम ठोकली. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावावा अशी मागणी सरपंच आब्बास शेख,भाऊसाहेब आढाव,विकास वाघ,पपु भिंगारे,देविदास वाघ,अशोक वाघ,नारायन वाघ,दिपक खुळे सोन्याबापू पिलगर, भाऊसाहेब चोथे, तेजस बाचकर, नवनाथ चोथे, जलील पठाण  येथील शेतक-यांनी केली आहे.

COMMENTS