Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भांडणात मध्यस्थी करणाऱ्या तरुणाचा पायचं छाटला.

मालेगावात दोन गटात राडा घटना सीसीटिव्हीत कैद

मालेगाव (Malegaon) शहरात बुधवारी रात्री मावस भावाच्या कुटुंबात सुरु असलेले वाद सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणावर धारदार तलवारीने हल्ला करण्यात आला आहे .

शाहीन आफ्रिदी दुसऱ्यांदा अडकणार विवाह बंधनात!
विद्यार्थ्याला बेशुद्ध होईपर्यंत शिक्षकांकडून जबर मारहाण
दिल्लीमध्ये एका व्यक्तीला बेदम मारहाण

मालेगाव (Malegaon) शहरात बुधवारी रात्री मावस भावाच्या कुटुंबात सुरु असलेले वाद सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणावर धारदार तलवारीने हल्ला करण्यात आला आहे . या हल्ल्यात तरुणाचा पाय छाटला गेला असल्याची माहिती मिळाली आहे . या घटनेला दोन दिवसांचा कालावधी उलटला आहे. तरी संशयित फरार असल्याची माहिती समजली आहे . मात्र या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपास यंत्रणेच्या हाती लागले आहेत. यात पाच ते सहा जणांच्या टोळक्याने मोहम्मद रशीद(Mohammed Rashid) या तरुणावर तलावारीने वार केल्याचे दिसून येत आहे . विशेष मालेगावात अशा घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. अशा घटना वारंवार घडत असल्याने पोलिसांचा वचक नसल्याचे उघडकीस आले आहे. शहरात इतकी गुन्हेगारी वाढली आहे की, नागरिक भीतीच्या सावटाखाली जगत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

COMMENTS