विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका घ्या : उद्धव ठाकरे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका घ्या : उद्धव ठाकरे

धनुष्यबाण शिवसेनेपासून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही

मुंबई/प्रतिनिधी : गेल्या 10-15 दिवसांत राज्यात जे काही घडले, ते संपूर्ण महाराष्ट्राने बघितले आहे. जनतेला या संपूर्ण प्रकरणाची चीड आहे. त्यामुळे हिंमत

शिवसेनेचे गोंधळलेले राजकारण
Sangamner : बोगस शिधापत्रिका प्रकरण शिवसेनेच्या विद्यमान पदाधिकाऱ्याला भोवणार?
अहमदनगरमध्ये शिवसेना- राष्ट्रवादीची पुन्हा दिसून आली एकी….

मुंबई/प्रतिनिधी : गेल्या 10-15 दिवसांत राज्यात जे काही घडले, ते संपूर्ण महाराष्ट्राने बघितले आहे. जनतेला या संपूर्ण प्रकरणाची चीड आहे. त्यामुळे हिंमत असेल, तर परत विधानसभेच्या निवडणुका घेऊन दाखवा, असे आव्हानच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले आहे. माध्यमांशी संवाद साधतांना ते बोलत होते.
या बंडखोरीनंतर शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात कायदेशील लढाई सुरु आहे. असे असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेकडून धनुष्यबाण हे चिन्हा कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही, असे ठणकावून सांगितले. मला सर्वसामान्य जनतेला धन्यवाद द्यायचे आहेत. ज्यांची ओळख नाही असे अनेक लोक मसेज पाठवत आहेत. हळहळ व्यक्त करत आहेत. जे काही घडलं ते या लोकांना मान्य नाही. त्यामुळे हे असे खेळ करत बसण्यापेक्षा परत एकदा विधानसभेची निवडणूक घ्या, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
तसेच, भारतीय पक्षाने जेव्हा घात केला, तेव्हाच आम्ही महाविकास आघाडीला जन्म दिला. आज जे काही त्यांनी घडवलेले आहे, ते जर अडीच वर्षांपूर्वी केले असते; तर सगळे सन्मानाने झाले असते. दोन हजार कोटी, तीन कोटी खर्चाचे आकडे येत आहेत. मात्र अडीच वर्षापूर्वी हे सन्मानाने झाले असते. जे सन्मानाने झाले असते ते घातपाताने का केले? जी गोष्ट दिलदारपणाने झाली असती, ती एवढा खर्च करुन का केली? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. मला असे वाटते, की विधानसभेच्या निवडणुका व्हायला पाहिजेत. जर आम्ही चूक केली असेल तर जनतेचा निर्णय आम्हाला शिरसावंद्य आहे. आम्ही घरी बसू. ते जर चुकले असतील, तर जनता त्यांच्याबद्दल जो निर्णय घेईल तोदेखील आम्हाला मान्य आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी सुवर्णमध्य काढावा : केसरकर
शिवसेना पक्षुप्रमुख उद्धव ठाकरे नव्या पक्षचिन्हाच्या तयारीत आहेत, अशी माहिती पुढे आली आहे. धनुष्यबाण हे पक्षचिन्ह सोडून इतर कोणतेही चिन्ह मिळाले तरी कंबर कसून हे चिन्ह घराघरात पोहोचवण्याची तयारी ठेवा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केल्याचे कळते. यावर एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना विनवणी केली आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी उद्धव ठाकरेंनी चर्चा केली तर हे दोन्ही पक्ष एकत्र येतील. काही कारणास्तव दुरावलेल्या पक्षांनी एकत्र आले तर या राजकीय ताणाचा सुवर्णमध्ये साधता येईल, असे आवाहन दीपक केसरकर यांनी केले.

COMMENTS