खंडाळा शहरात अतिक्रमण हटाओ मोहिम: नगरपंचायतीच्या मुख्याधिकार्‍यांना धमक्या; पोलीस ठाण्यास तक्रार दाखल

Homeमहाराष्ट्रसातारा

खंडाळा शहरात अतिक्रमण हटाओ मोहिम: नगरपंचायतीच्या मुख्याधिकार्‍यांना धमक्या; पोलीस ठाण्यास तक्रार दाखल

खंडाळा शहरात अतिक्रमणे हटाव मोहीमेनंतर मुख्याधिकारी योगेश डोके यांना अनेकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

राष्ट्रवादीतर्फे रविवारी तिरंगा रॅलीचे आयोजन- ढाकणे
13 वर्षीय मुलीचा विवाह लावणारे गोत्यात (Video)
नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड

लोणंद / वार्ताहर : खंडाळा शहरात अतिक्रमणे हटाव मोहीमेनंतर मुख्याधिकारी योगेश डोके यांना अनेकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यांना शिवीगाळ व धमकी दिल्याने मुख्याधिकारी योगेश डोके यांनी याप्रकरणी खंडाळा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महेश इंगळे यांच्याकडे तक्रार दिली आहे.

योगेश डोके यांनी दिलेल्या तक्रारी अर्जात असे म्हटलेले आहे की, दि. 18 मार्च रोजी खंडाळा शहरातील अतिक्रमण सार्वजनिक बांधकाम विभाग खंडाळा, महसूल विभाग खंडाळा, नगरपंचायत खंडाळा यांच्या संयुक्त कार्यवाहीत पोलीस बंदोबस्तात निष्कालीत करण्यात आले आहे. याचा राग मनात धरून दि. 19 मार्च रोजी दुपारी 2 च्या सुमारास प्रितम गायकवाड व इतर 10 ते 15 लोकांनी तहसील कार्यालयासमोरील आवारात मला शिवीगाळ करून अतिक्रमणे का काढली? तुला बघून घेतो असे म्हणून धमकी दिली. यावेळी मुख्याधिकारी योगेश डोके यांच्यासोबत कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. मला व माझ्या कार्यालयातील कर्मचार्‍यांना धोका वाटत असून आमच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच कर्मचार्‍यांचे मनोबल खच्चीकरण होत आहे. असे मुख्याधिकारी यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे. प्रितम गायकवाड व त्यांच्या सोबत असलेले इतर 10 ते 15 अनोळखी इसम यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

याप्रसंगी नगरपंचातीच्या कर्मचार्‍यांनी खंडाळा तहसीलदार तसेच खंडाळा पोलीस ठाण्यात निवेदन देत कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

आम्ही सर्व कर्मचारी अस्वस्थ असून कर्मचार्‍यांमध्ये जीवितास धोका असून, कर्मचार्‍यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असल्याचे निवेदनात म्हटले आहे. जोपर्यंत कारवाई होत नाही. तोपर्यंत नगरपंचायतीचे काम बंद आंदोलनासह नगरपंचायतीच्या अत्यावश्यक सेवासह सर्व कामकाज बंद करत आहोत, असा आक्रमक पवित्रा घेत कर्मचार्‍यांनी आपली मागणी प्रशासनासमोर मांडली.

COMMENTS