शिवसैनिकांपेक्षा उद्धव ठाकरेंना शरद पवार अधिक प्रिय : केसरकर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवसैनिकांपेक्षा उद्धव ठाकरेंना शरद पवार अधिक प्रिय : केसरकर

गुवाहाटी : आम्ही आदरणीय उद्धव ठाकरे याना आपण राष्ट्रवादी आणि काँग्रेसोबतची युती तोडावी असा सल्ला देत होतो. आम्ही खरे शिवसैनिक आहोत. मात्र त्यांना शिव

फडणवीसांच्या कारवर चप्पल फेक करणाऱ्यांवर कुठला गुन्हा दाखल होणार
आधुनिक महाराष्ट्राचा विकासमार्ग : समृद्धी महामार्ग
खिर्डी गणेशमध्ये बिबट्याचा संचार

गुवाहाटी : आम्ही आदरणीय उद्धव ठाकरे याना आपण राष्ट्रवादी आणि काँग्रेसोबतची युती तोडावी असा सल्ला देत होतो. आम्ही खरे शिवसैनिक आहोत. मात्र त्यांना शिवसैनिकांपेक्षा शरद पवार आणि त्यांचा पक्ष अधिक प्रिय आहेत. हे सर्वांना मान्य होणारे नाही. त्यामुळे यापुढे काही चर्चेची अपेक्षा आहे असे वाटत नाही. आता वेळ निघून गेलेली आहे आता निर्णय विधानसभेच्या पटलावरच होईल, असे दीपक केसरकर यांनी स्पष्टपणे सांगितले. कामाख्या देवीचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलत होते. दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जायचे नाही. महाविकास आघाडीने आपली नाटके आता थांबवावीत. आमची हात जोडून विनंती आहे की, आता ताणून धरू नका. तुमच्याकडे बहुमत नाही हे मान्य करा. विधानसभेच्या विशेष अधिवेशनात बहुमत चाचणीवेळी केवळ अपक्षांनी भाजपच्या बाजूने मतदान केले तरी हे सरकार पडेल, ३९ लोक तर सोडूनच द्या. त असा टोलाही दीपक केसरकर यांनी लगावला आहे.

COMMENTS