कोरोनाबाधितांच्या मृतदेहांचा जिल्हा रुग्णालयात खच

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरोनाबाधितांच्या मृतदेहांचा जिल्हा रुग्णालयात खच

गुजरातमधल्या वलसाडमधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृतदेहांचा खच पडला आहे.

पेसा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुढील १५ वर्षांची ब्लू प्रिंट तयार करा – राज्यपाल
पुनीत कुमारचा शेवटचा चित्रपट झाला प्रदर्शित | LokNews24
जम्मू-काश्मिरात दोन दहशतवादी ठार

 सुरत : गुजरातमधल्या वलसाडमधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृतदेहांचा खच पडला आहे. गेल्या तीन दिवसांपासून 15 हून अधिक मृतदेह रुग्णालयात पडून आहेत. आता या मृतदेहांची दुर्गंधी सुटली आहे. मरणानंतरही यातना संपत नाही, हाच अनुभव येथे येतो आहे. 

वलसाडमधील रुग्णालयात कोरोना रुग्णांचे मृतदेह पारदर्शक बॅग्समध्ये ठेवण्यात आले आहेत. हे मृतदेह अद्याप कुटुंबीय किंवा नातेवाइकांकडे सोपवण्यात आलेले नाहीत. गेल्या तीन दिवसांपासून मृतदेह आयसोलेशन वॉर्डमध्येच असल्याने आता त्यामधून दुर्गंधी येऊ लागली आहे. वलसाडमधील रुग्णालयात 300 खाटा आहेत. सध्याची परिस्थिती पाहता शंभर खाटा वाढवण्यात आल्या आहेत. या सगळ्या खाटा सध्या भरल्या आहेत. याशिवाय जिल्हा प्रशासन आणखी सोयी सुविधा उपलब्ध करण्याच्या प्रयत्नात आहे. वलसाड गुजरातमधील सीमावर्ती जिल्हा आहे. वलसाडची सीमा महाराष्ट्राला लागून आहे. जवळच्या डांग आणि नवसारी जिल्ह्यांमधले रुग्णदेखील उपचारांसाठी वलसाडमध्ये येतात. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी प्रोटोकॉल पाळण्याच्या सूचना अधिकार्‍यांना दिल्याचे जिल्हाधिकारी आर. आर. रावल यांनी सांगितले. हेल्प डेस्क तयार करून रुग्णांचे मृतदेह तातडीने त्यांच्या कुटुबांकडे सुपूर्द करा, असे आदेश रुग्णालय प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. रुग्णालयातून मृतदेह मिळण्यास 12 तासांचा विलंब होत असल्याची तक्रार अनेक कुटुंबीयांनी केली.

COMMENTS