Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पालिकेच्या अग्नीशमन केंद्रावर गाड्या धुण्याचे सेंटर सुरू : विक्रमभाऊ पाटील

इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी वैभव साबळे यांच्या अकार्यक्षमतेमुळे गेली 5 महिन्याहून अधिक काळ शहरात पाणी टंच

भूलतज्ज्ञ संघटनेची देशव्यापी मशाल यात्रा बुधवारी कराडमध्ये येणार
खोडशीजवळ इनोव्हाची रिक्षाला जोराची धडक : गोटेतील 1 ठार
विश्‍वास साखर कारखान्याकडून प्रतिटन तीन हजार रुपये वर्ग

इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी वैभव साबळे यांच्या अकार्यक्षमतेमुळे गेली 5 महिन्याहून अधिक काळ शहरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. शहरातील जनता पिण्याच्या पाण्यासाठी टाहो फोडत असताना नगरपालिकेचे कर्मचारी अग्नीशमन केंद्रावर बेकायदेशीर गाड्या धुण्याच सेंटर सुरू केले असल्याचा आरोप विकास आघाडीचे अध्यक्ष विक्रमभाऊ पाटील यांनी केले आहे.
पिण्याच्या पाण्याच्या कृत्रिम टंचाईमुळे घरातील लहान मुली मोकळ्या घागरी घेवून अग्नीशमन केंद्रावरून पाणी भरून आणत आहेत. दुसर्‍या बाजूला हे अधिकारी राजरोसपणे आपल्या गाड्या धुवून घेत आहेत. मुख्याधिकारी हे शहराचा विकास करू शकत नाहीत. मात्र, स्वतः चा विकास करून घेण्यासाठी करेक्ट नियोजन केले आहे. हे या इस्लामपूर शहरात खपवून घेणार नाही. याची नोंद साबळे यांनी घ्यावी, असा इशारा विक्रमभाऊ पाटील यांनी दिला.
इस्लामपूर नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. गुंठेवारी नियमन करण्याबाबत लोकांना त्रास दिला जातो. एसटीपी प्लांटचे काम अद्याप चालू नाही. शहरात प्रचंड प्रमाणात अस्वच्छता आहे. परिसराज डेंग्यूने थैमान घातले आहे. अशा मुख्याधिकारी यांच्यावर जिल्हाधिकारी यांनी लवकरात लवकर कारवाई करावी. अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा भाजपचे नेते विक्रमभाऊ पाटील यांनी दिला आहे.

COMMENTS