देशमुख-मलिकांना विधान परिषद निवडणुकीत मतदानाची परवानगी नाकारली

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देशमुख-मलिकांना विधान परिषद निवडणुकीत मतदानाची परवानगी नाकारली

मुंबई : राज्यसभेपाठोपाठ विधान परिषद निवडणुकीत देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदान करता येणार नाही. २० जून रोजी वि

वंचित बहुजन आघाडीचा ओबीसी संवाद उत्साहात
नगरच्या सनफार्मा कंपनीत आग लागून कामगाराचा मृत्यू | DAINIK LOKMNTHAN
महावितरणचा महादिलासा : उच्चांकी मागणीएवढा अखंडित वीजपुरवठा

मुंबई : राज्यसभेपाठोपाठ विधान परिषद निवडणुकीत देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदान करता येणार नाही. २० जून रोजी विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी दोन्ही नेत्यांनी याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयात केली होती. मात्र न्यायालयाने ती मागणी फेटाळून लावली. या निर्णयामुळे महाविकास आघाडीला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. दरम्यान आता दोघेही आपल्याला मताचा अधिकार मिळावा, यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. कोठडीत असलेले देशमुख-मलिक यांना विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान करता यावं, यासाठी न्यायालयात काल, गुरुवारी सुनावणी पार पडली. सुनावणीनंतर न्यायमूर्तींनी निकाल राखून ठेवला होता. आज, शुक्रवारी दुपारी अडीच वाजता निकाल देणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते. अखेर न्यायालयाने सदर याचिका फेटाळून लावत त्यांना मतदान करता येणार नसल्याचा निकाल जाहीर केला.

COMMENTS