Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आबा गट इस्लामपूर पालिका निवडणुकीत 4 प्रभाग लढविणार

इस्लामपूर / प्रतिनिधी : पालिका निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. राष्ट्रवादीसह भाजपने आपली यंत्रणा कामाला लावली आहे. इच्छुकांनी आपापल्या प्रभागात मोर्

पाटण तालुक्यातील 86 ग्रामपंचायतींचा निवडणूकीचा बिगुल वाजला
जयंत कबड्डी प्रिमियर लीग’चे 20 फेब्रुवारी ला शुभारंभ; राष्ट्रीय कबड्डीपटू खंडेराव जाधव यांची माहिती
ज्येष्ठ विधीज्ञ कॉ. धैर्यशील पाटील यांचे सातारा येथे निधन

इस्लामपूर / प्रतिनिधी : पालिका निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. राष्ट्रवादीसह भाजपने आपली यंत्रणा कामाला लावली आहे. इच्छुकांनी आपापल्या प्रभागात मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. प्रत्येक गटाचे कार्यकर्ते आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी नेत्याकडे हेलपाटे मारत असल्याचे चित्र दिसत आहेत. मात्र, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांचे पुत्र सुरज व सतेज पाटील यांनी प्रभाग 2, 3, 11 व 12 मधून तयारी सुरू केली आहे. तरी सौ. मनीषा पाटील व सुरज पाटील हे राष्ट्रवादी की भाजपकडून लढणार याबाबत शहरात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
शहरात नगरपालिका निवडणुकीची प्रभाग रचना व आरक्षण जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजप व राष्ट्रवादीने संभाव्य उमेदवारांची यादी तयार केली आहे. काहींनी पक्षाने तिकीट देऊ अगर न देऊ स्वबळावर लढण्याचा विचार चालू केला आहे. माजी नगरसेविका सौ. मनीषा जयवंत पाटील व युवा नेते सुरज पाटील यांनी मनीषा सहेली मंच, पतसंस्था, जयवंत आबा युवा शक्तीच्या माध्यमातून राष्ट्रवादी व भाजपला बाजूला ठेवत पालिकेच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. जयवंत आबा गटाने पालिका निवडणूकित प्रभाग 2, 3, 11 व 12 लढविण्याचा निर्धार केला आहे. प्रभाग 12 मध्ये आबा गटातून महिला किंवा पुरुष दिला तर माजी नगरसेवक शिवाजी पवार यांनी ही महिला किंवा पुरुष देण्याची तयारी केली आहे. प्रभाग 12 मधून राष्ट्रीय खेळाडू संजयभाऊ पाटील, माजी नगरसेवक कपिल ओसवाल, आयुब हवालदार, शिवाजी पवार हे या प्रभागांतून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. युवा नेते सुरज व सतेज पाटील या दोघांनी या प्रभागात वैयक्तीक संपर्क, भेटी-गाठी ठेवत मतांची गोळाबेरीज करण्याचे काम सुरू केले आहे. आबा गटाला राष्ट्रवादीसह भाजपच्या नेत्यांची ताकद पाठीशी असल्याची शहरात चर्चा आहे.
जयवंत पाटील हे 15 वर्षे झाली वनवास भोगत आहेत. जयवंत आबा नसल्याने या गटावर अन्याय होत आहे. त्यामुळे आबा गटाने पालिका निवडणूक स्व:बळावर लढविणार असल्याचे सुरज पाटील सांगत आहेत. आबा गट राष्ट्रवादीतून बाहेर पडला तर पालिका राजकारणात राष्ट्रवादीला फटका बसण्याची शक्यता आहे. या पालिका निवडणुकीत जयवंत आबा गटाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. माजी नगरसेविका सौ. मनीषा पाटील, सूरज पाटील, सतेज पाटील यांनी पालिका निवडणूकित 4 प्रभाग लढविण्याची तयारी सुरू केली आहे.

COMMENTS