प्रभाग रचना बदलल्याने नेत्यांची डोकेदुखी वाढणार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रभाग रचना बदलल्याने नेत्यांची डोकेदुखी वाढणार

देवळाली प्रवरा नगरपालिकेसाठी आरक्षण सोडत जाहीर

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी : देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या आगामी होऊ घातलेल्या निवडणूकीसाठी राज्य निवडणूक यांच्या आदेशानुसार अनुसूचित जाती महिला, अनुसूच

जलजीवन मिशन योजने अंतर्गत कामाची चौकशी करावी
राज्यात कोरोना रुग्ण संख्येचा स्फोट; सलग दुसर्‍या दिवशी 41 हजाराच्यावर कोरोना रुग्ण आढळले
शेवगाव तालुक्यातील शेअर मार्केटमधील फसवणुकीची चौकशी करा

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी : देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या आगामी होऊ घातलेल्या निवडणूकीसाठी राज्य निवडणूक यांच्या आदेशानुसार अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिला आरक्षणाची सोडत आज सोमवारी काढण्यात आली.काही खुशी काही गम निर्माण झाले आहे.स्वतःच्या प्रभागात आरक्षण पडल्याने काहींना पाहुणे कलाकार म्हणून दुसर्‍या प्रभागात निवडणूक लढवावी लागणार आहे.नगरपरिषदेच्या आरक्षण सोडत काढण्यासाठी पालिकेने समर्थ बाबुराव पाटील सांस्कृतिक भवनात नियोजन केले. दोनशे ते तीनशे खुर्च्याची व्यवस्था करण्यात आली.परंतू सत्ताधार्‍यांसह विरोधक बोटावर मोजण्या इतकेच उपस्थित राहिल्याने आरक्षण काढण्यासाठी सत्ताधार्‍यासह विरोधकांनी पाठ फिरविल्याचे जाणवत होते. अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिला आरक्षणाची सोडत भूसंपादनचे विभागाच्या उपजिल्हाधिकारी जयश्री आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली.त्यांना मुख्याधिकारी अजित निकत यांनी सहकार्य केले.यावेळी आरक्षणाची सोडत वेदिका सोमनाथ सोमनाथ सुर्यवंशी व राधीक सतिष पठारे या दोन लहान मुलांच्या हस्ते काढण्यात आल्या. यावेळी नगरपालिका निवडणूकिसाठी इच्छुक असलेले उमेदवार व ठराविक कार्यकर्ते उपस्थित होते. आरक्षण सोडतीनंतर आपला प्रभाग रचनेत तुटला गेल्याने एकाच प्रभागात इच्छुक झाल्याने नेत्यांची डोके दुःखी ठरणार आहे.तर काही प्रभागात खुशी तर काही ठिकाणी गम निर्माण झाले आहे. आरक्षण सोडतीनंतर अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला तर काहींनी समाधान व्यक्त केले आहे. एकाच प्रभागात दोन तीन उमेदवार आल्याने जागा कोणाला सोडायची असा प्रश्‍न निर्माण होणार आहे.पाहुणे कलाकार म्हणून दुसर्‍या प्रभागात निवडणूक लढवावी लागणार आहे. आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना मागविण्याचा कालावधी 15 जून ते 21 जून ठेवण्यात आला आहे. 29 जूनपर्यंत विभागीय आयुक्त नगरपरिषद नगरपंचायत सदस्य पदांच्या आरक्षणास मान्यता देणार आहे. बाळासाहेब चव्हाण, अजय खिलारी, दिपक पठारे, सुनिल कराळे, संतोष चोळके, दत्ता कडू, डाँ.विश्‍वासराव पाटील, अमोल कदम, सचिन कोठुळे, रामेश्‍वर तोडमल, केदारनाथ चव्हाण, भिमराज मुसमाडे, भारत शेटे आदी उपस्थित होते. आरक्षण सोडत काढण्यात मुख्याधिकारी अजित निकत यांच्यासह कार्यालयीन अधिक्षक सुदर्शन जवक, संभाजी वाळके,राजेंद्र हारगुडे, मनोज पापडीवाल आदींनी सहकार्य केले.

आरक्षण सोडत
प्रभाग :- 1 अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग :- 2 अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण,प्रभाग :- 3 अ अनुसूचित जाती महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग :- 4 (3 जागा) अ अनुसूचित जाती महिला, ब सर्वसाधारण महिला, क सर्वसाधारण, प्रभाग :- 5 अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग :- 6 अ अनुसूचित जमाती महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग :- 7 अ अनुसूचित जाती, ब सर्वसाधारण महिला, प्रभाग :- 8 अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग :- 9 अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग :- 10 अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण,

COMMENTS