भारत हा देश बहुजन बहुल आहे. या बहुजनांत हिंदू जीवन पध्दतीचे आचरण करणारा सर्वात मोठा घटक हा ओबीसी समाज आहे. मात्र, आतापर्यंत ब्राह्मणी धर्माचे कवच म्
भारत हा देश बहुजन बहुल आहे. या बहुजनांत हिंदू जीवन पध्दतीचे आचरण करणारा सर्वात मोठा घटक हा ओबीसी समाज आहे. मात्र, आतापर्यंत ब्राह्मणी धर्माचे कवच म्हणून हिंदूंचा उपयोग करण्यात आला आहे, हे अनेक गोष्टींवरून सिध्द होते. तरीही, हा मुद्दा आपण शेवटी चर्चेला घेऊ. सर्वप्रथम, हिंदू राष्ट्र अधिवेशनाच्या नावाखाली ब्राह्मणी धर्माच्या मजबुतीसाठी सरसावलेली हिंदू जनजागरण समितीचे म्हणणे आहे की, देशात नऊ राज्यात हिंदू अल्पसंख्यांक आहेत. यात त्यांनी पंजाब चा उल्लेख करतांना म्हटले की, तेथे खलिस्तानी चळवळ सुरू आहे. असा आरोप हाच मुळात राष्ट्रविरोधी आहे. कारण पंजाब या राज्यात शीख समुदाय आहे. शीख हा गुरूनानक यांनी स्थापन केलेला एक समतेची जीवन मार्ग आहे. या शीख बांधवांनी देश एकसंघ राखण्यासाठी सर्वाधिक बलिदान दिले आहे. अशा शूर आणि शौर्यशाली संस्कृती असणाऱ्या पंजाबविषयी असे आरोप आता करणे, राष्ट्रविरोधी आहे. याच पंजाब राज्यात स्वर्गिय इंदिरा गांधी पंतप्रधान असताना, ऑपरेशन ब्लू स्टार च्या माध्यमातून अल्पसंख्य खलिस्तान चळवळीचा खात्मा करून टाकला आहे. त्याची किंमत इंदिरा गांधी यांना प्राणाचा मोबदला देऊन चुकवावी लागली. याला आख्खे राष्ट्र साक्षी असताना पुन्हा पंजाब किंवा तेथील शीख बांधवांवर खलिस्तानचा आरोप लावणे, हेच देशविरोधी कृत्य आहे. त्याचप्रमाणे, तामिळनाडू या राज्यातील जनतेवर त्यांनी द्रविडीस्तान निर्माण करण्याचा आरोप करून हिंदू अल्पसंख्यांक असल्याचे धादांत खोटी माहिती प्रसृत केली आहे. वास्तविक, तामिळनाडू या राज्यात सर्वाधिक संख्याबळ हे हिंदूंचे आहे. परंतु, हिंदू असणाऱ्या या समाजाची मुले वस्तीगृहात शिकत असताना त्यांच्या वस्तीगृहात बनणारे भोजन ब्राह्मण मुलांना चालत नव्हते. त्यामुळे, दोन भोजनगृह चालविली जात होती. ब्राह्मण विद्यार्थ्यांना वेगळे आणि हिंदू विद्यार्थ्यांसाठी वेगळे भोजनगृह. हा भेद स्वाभिमानाचे मेरूमणी रामस्वामी पेरियार नायकर यांच्या लक्षात येताच, त्यांनी त्या राज्यात हिंदूंची प्रबळ असलेली स्वाभिमान चळवळ चालवली. त्यातूनच आज देशातील कोणत्याही राज्यात नाही, एवढे ब्राह्मण – ब्राह्मणेतर विभाजन तामिळनाडूत मजबूत झाले आहे. याचाच परिणाम तामिळ हिंदू जनतेला अहिंदू म्हणण्याचे पातक हिंदू जनजागरण समिती करित आहे. यातूनही स्पष्ट होते की, ही समिती हिंदू धर्म आणि हिंदू धर्मियांसाठी कार्यरत नसून ब्राह्मण श्रेष्ठत्व स्थापन करण्यासाठी सगळा आटापिटा करते आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध होते. त्याचप्रमाणे उत्तरपूर्वेतील पाच राज्य जी आदिवासी बहुल आहेत, त्या राज्यांना हिंदू मानत नाही, ही मानसिकता संविधान विरोधी आहे. केरळ आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा उल्लेख मात्र ते राष्ट्रविरोधी कारवाया करणारे राज्य म्हणून करतात; याचा अर्थ सरळ आहे की, केरळ ची जनता देशात सर्वाधिक साक्षर असल्याने त्यांनी विज्ञाननिष्ठ जीवनपद्धती स्विकारली आहे. केरळ आणि पश्चिम बंगाल मध्ये संघ-भाजप विचारधारेला थारा मिळत नसल्याने, ते या राज्यांना राष्ट्रविरोधी कारवाया करणारे राज्य म्हणून ओरड करताहेत. याउलट कर्नाटक या राज्याचा आपण विचार केला तर कर्नाटकात हिंदू अल्पसंख्यांक आहेत. कारण तेथे समतावादी बसवप्पा यांचा लिंगायत धर्म आहे. लिंगायत धर्माने हिंदू या मान्यतेला नाकारले आहे, तरीही, हिंदू जनजागरण समिती त्या राज्याला हिंदू अल्पसंख्यांक राज्याचा दर्जा आपल्या भूमिकेत देत नाही! याचे कारणही सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे की, त्याठिकाणी संघ विचारसरणीच्या भारतीय जनता पक्षाला वारंवार राजकीय सत्ता प्राप्त होत असल्याने ते असे म्हणण्यास धजावत नाहीत. गोव्यात अधिवेशन घेत असतानाच त्यांनी हे जाहीर केले की, ‘हलाल’ ची पर्यायी इस्लामिक अर्थव्यवस्था चालविली जात आहे. यातही, समितीचा खोटारडेपणा असा की, इस्लामी देशात हलाल केलेले मांस निर्यात केले जाते. भारतातून अरब देशांत जे हलाल मांस निर्यात केले जाते, अशा पाचही मोठ्या कंपन्या या ब्राह्मणांच्या आहेत, अशी माहिती मागे एका मोठ्या पत्रकाराने स्टिंग ऑपरेशन करून उघडकीस आणले आहे. शिवाय, ज्या गोव्यात या समितीचे अधिवेशन घेतले जात आहे, त्या गोव्यात गोमांस बंदी नसल्याचे आश्वासन देऊन संघ परिवारातील भाजपने सत्ता जिंकली, हे या समितीने विसरू नये!
क्रमशः (भाग – ३)
COMMENTS