लाखाची लाच घेताना दोन पोलीस कर्मचार्‍यासह नगरसेवकाचा मुलगा जाळ्यात

Homeमहाराष्ट्र

लाखाची लाच घेताना दोन पोलीस कर्मचार्‍यासह नगरसेवकाचा मुलगा जाळ्यात

आत्महत्येस प्रवृत्त केल्याची गुन्ह्यातील संशयित आरोपीची पोलीस कोठडी न वाढवणे आणि गुन्ह्याच्या तपास कामात मदत करणसाठी 1 लाखांची लाच स्वीकारताना विट्याचे सपोनि प्रदिप पोपट झालटे, कॉन्सटेबल विवेक यादव (वय 28) आणि विटा नगरपालिकेच्या विद्यमान नगरसेवकाचा मुलगा अकीब फिरोज तांबोळी (वय 23) या तिघाला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. ही कारवाई विटा येथे शुक्रवारी करण्यात आली.

विद्यार्थ्यांसाठी मी मोठा भाऊ म्हणून सदैव पाठीशी
कष्टकरी बांधव कधीच कामचुकारपणा करत नाही ः बाबा आढाव
नगरच्या निवडणूक विजयाची डीजे मिरवणूक चर्चा मुंबईत

सांगली / प्रतिनिधी : आत्महत्येस प्रवृत्त केल्याची गुन्ह्यातील संशयित आरोपीची पोलीस कोठडी न वाढवणे आणि गुन्ह्याच्या तपास कामात मदत करणसाठी 1 लाखांची लाच स्वीकारताना विट्याचे सपोनि प्रदिप पोपट झालटे, कॉन्सटेबल विवेक यादव (वय 28) आणि विटा नगरपालिकेच्या विद्यमान नगरसेवकाचा मुलगा अकीब फिरोज तांबोळी (वय 23) या तिघाला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. ही कारवाई विटा येथे शुक्रवारी करण्यात आली. 

याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार हे खाजगी ठिकाणी दिवानजी म्हणून काम करतात. तक्रारदार यांचे मालका विरूध्द विटा पोलीस ठोणे येथे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल आहे. या गुन्हात तक्रारदाराराच्या मालकांना अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी व वाढीव पोलीस कोठडी न मागण्यासाठी विटा पोलीस ठाण्याचे सपोनि झालटे व कॉन्स्टेबल यादव या दोघांनी तक्रारदारास दीड लाख रूपयाची लाच मागितली असल्याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे आली होती. 

ब्युरोचे कार्यप्रणाली प्रमाणे पडताळणी केली असता लोकसेवक झालटे व लोकसेवक यादव यांने तक्रारदाराकडे दीड लाख रूपये लाचेची मागणी करून शुक्रवार, दि. 26 रोजी 1 लाख रूपये आणून देण्यास सांगितले होते. त्यानुसार विटा पोलीस ठाण्याच्या परिसरात सापळा लावण्यात आला. झालटे आणि यादव यांनी तक्रारदाराकडे दीड लाख रूपये लाचेची मागणी केली. तसेच कॉन्सटेबल विवेक यादव याच्या सांगण्यावरून विट्यातील विद्यमान नगरसेवकाचा मुलगा अकीब फिरोज तांबोळी याने तक्रारदाराकडून 1 लाख रूपये स्विकारमाना त्याला रंगेहात पकडणत आले आहे.

विटा नगरपालिकेच्या नगरसेवकचा मुलगा पंटर

खासगी सावकारी, मटका-जुगार अड्डे यासह हप्ते वसूलीमुळे विटा पोलीस ठाण्याची अब्रु चव्हाट्यावर टांगली आहे. याबरोबरच विटा नगरपरिषदेच विद्यमान नगरसेवकाचा मुलगा पोलिसांचा पंटर बनून लाखो रूपयांची वसूली करत असल्याचे उघडकीस आल्यामुळे पोलिसांसह राजकीय नेतेमंडळीच्या स्वच्छ चेहर्‍यावरील बुरखा फाटला असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

27-2

COMMENTS