Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पावसाळ्यापूर्वी कास तलावाच्या सांडव्याचे काम पूर्ण

सातारा / प्रतिनिधी : सातारा शहराचा जलदाता असणार्‍या कास धरणाच्या सांडव्याचे काम पूर्ण झाले असून, नुकतीच राज्यसभेचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराज

 हवामान बदलामुळे भाजीपाला पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव 
वडी येथे मांडुळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल
शेतक-यांना ठिबक सिंचन आता ७५ आणि ८० टक्के अनुदानावर मिळणार: दादाजी भुसे

सातारा / प्रतिनिधी : सातारा शहराचा जलदाता असणार्‍या कास धरणाच्या सांडव्याचे काम पूर्ण झाले असून, नुकतीच राज्यसभेचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कामाची पाहणी केली. पाहणीदरम्यान त्यांनी झालेल्या कामाबाबत समाधान व्यक्त करत पावसाळा सुरू होण्यापूर्वी इतर सर्व कामे पूर्ण करण्याच्या सूचना केल्या.
शहराच्या काही भागांस कास धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो. वाढणारी लोकसंख्या आणि शहराचा होणारा विस्तार लक्षात घेत कास धरणाच्या भिंतीची उंची वाढविण्याचे काम सातारा पालिकेने हाती घेतले. यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडून आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून दिला. या निधीतून भिंतीची उंची वाढविण्याचे हाती घेतलेले काम अंतिम टप्प्यात आहे. या कामाची पाहणी आज उदयनराजे यांनी केली. यावेळी पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता विजय घोगरे, मुख्याधिकारी अभिजित बापट, माजी उपाध्यक्ष मनोज शेंडे, प्रकल्प, तसेच पालिका अधिकारी उपस्थित होते.
उदयनराजेंनी भिंत, सांडवा व त्या परिसरातील इतर कामांची पाहणी करत पावसाळ्यापूर्वी बामणोली खोर्‍याला जोडणारे रस्ते, तसेच इतर सर्व कामे पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. सांडव्याचे काम पूर्ण झाले असून, त्याठिकाणची इतर तांत्रिक कामे युध्द पातळीवर पूर्ण होणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी यावेळी मांडले. धरणाच्या भिंतीची उंची वाढविल्यामुळे येणार्‍या पावसाळ्यात कास तलावामधील पाणीसाठ्यात वाढ होणार आहे. यापुढील काळात पाणी कपातीला सामोरे जावे लागणार नसल्याचा विश्‍वासही उदयनराजे भोसले यांनी यावेळी व्यक्त केला.

COMMENTS