Homeताज्या बातम्या

लोणंदचा कचरा असाच पेटत राहणार ? नगरपंचायतीकडून घनकचरा प्रकल्प कधी मार्गी लागणार ?

लोणंद : निंबोडी रोडवर असलेल्या कचरा डेपोस आग लागल्याने जळून खाक झालेला कचरा. (छाया : सुशिल गायकवाड) लोणंद / प्रतिनिधी : लोणंद, ता. खंडाळा येथील नि

अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणा कार्यरत
 पुण्यातील प्राणी संग्रहालयातून बिबट्या पसार
माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांच्याकडून नुतन पदाधिका-यांचे अभिनंदन

लोणंद / प्रतिनिधी : लोणंद, ता. खंडाळा येथील निंबोडी रोडवर असलेल्या कचरा डेपोस आग लागल्याने लोणंदमध्ये घनकचरा व्यवस्थापनाचा विषय पुन्हा ऐरणीवर आलेला आहे. जिथे जागा उपलब्ध होईल अशा ठिकाणी कचरा डेपो तयार केला जात आहे. त्यामुळे कचर्‍या डेपोचे ठिय्ये बदलत आहेत. यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी घनकचरा प्रकल्प उभारणे गरजेचे आहे.
गेली अनेक वर्षांपासून हा प्रकल्प व्हावा म्हणून लोकांकडून मागणी होत आहे. परंतू या विषयाकडे जागेअभावी तसेच अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे याकडे दुर्लक्ष होत असल्याने कचर्‍याची समस्या आजही जैसे थे आहे. प्रकल्प उभारण्यासाठी जागाच उपलब्ध होत नसल्याने या प्रकल्पाला खो बसला आहे. लोणंद शहरातील कचरा गोळा केल्यानंतर तो साठवून ठेवण्यासाठी कचर्‍याचे डेपो ही सारखे बदलावे लागलेले आहेत. कचरा डेपोचा प्रश्‍न हा गंभीर झाला असून यासाठी यापूर्वी आंदोलन करण्यात आले होते. कचरा पेटला की लोणंदकर नागरिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाबाबत प्रश्‍न उपस्थित करतात. प्रत्येक वेळी कचरा डेपो पेटत असताना तो पेटला आहे की पेटविला गेला आहे असा प्रश्‍न उपस्थित होतो. घनकचरा प्रकल्पास जागा मिळत नसल्याने कचरा डेपोचे ठिय्ये करावे लागत आहेत. एखाद्या घोंगडी प्रमाणाने हा प्रकल्प भिजत पडलेला आहे. घनकचरा प्रकल्पाबाबत अभ्यासदौरा करण्यात आला. अभ्यासदौर्‍याचे लवकरच चीज व्हावे आणि लवकरच हा प्रकल्प उभारला जावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. आज आगीचा पेट घेतलेल्या कचर्‍याबाबत पुन्हा एकदा लोणंदचा रखडलेला कचरा व्यवस्थापन प्रकल्पाबाबत ठोस निर्णय घेण्याची वेळ आली असून यावर तोडगा काढण्यासाठी येथील नगरपंचायतीचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यायला हवाच.

घनकचरा प्रकल्प उभारणे हाच पर्याय : सुनील यादव
लोणंद नगरपंचायतीच्या कचरा डेपोला आग लागते की लावली जाते. हा एक प्रश्‍न उपस्थित होत आहे. गेल्या वेळी गोटेमाळ पाण्याच्या टाकी खाली अशाच प्रकारे कचरा डेपोला आग लागली होती. त्याच प्रमाणे आजही निंबोडी रोड येथील कचरा डेपोला आग लागल्याने यापूर्वीच्या कचरा डेपो ला लागलेल्या आगीची आठवण झाली. हे कुठवर असेच चालणार, पेटलेला कचरा असाच पाहायचा आणि असाच विझवत राहायचे का? हे आता थांबायला हवे. घनकचरा प्रकल्प उभारणे हाच यावर
एक पर्याय आहे.

COMMENTS