Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सांगोला तालुक्यात झालेल्या अपघातात वरकुटे-मलवडी येथील दोन तरुणांचा मृत्यू

गोंदवले / वार्ताहर : चिकमहूद ते दिघंची मार्गावरील हॉटेल विशाल जवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला समोरासमोर धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण जा

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा 2 लाख 87 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त
इस्लामपुर अर्बन बँकेला 72 लाख रुपयांचा नफा : अध्यक्ष संदीप पाटील यांची माहिती
राष्ट्रीय महामार्गावर धारधार शस्त्रासह एकास अटक

गोंदवले / वार्ताहर : चिकमहूद ते दिघंची मार्गावरील हॉटेल विशाल जवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला समोरासमोर धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार तर एकाचे दवाखान्यात निधन झाला आहे. अपघातातील मयत तरुण हे वरकुटे-मलवडी, ता. माण, जि. सातारा येथील आहेत.
आज रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास चिकमहूद (ता. सांगोला) ते दिघंची (जि. सांगली) मार्गावर चिकमहूद शिवारातील हॉटेल विशाल जवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली. या अपघातात सुशांत शांताराम जाधव (वय 28,) रा. वरकुटे-मलवडी, ता. माण, जि. सातारा) हे जागीच ठार झाले. तर त्यांच्या सोबत असणारा मंगेश शिवाजी पिसे (वय 28, रा. वरकुटे-मलवडी, ता. माण, जि. सातारा) हा गंभीर जखमी झाला होता. त्याला पुढील उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. वरकुटे-मलवडी येथील हे दोघेजण त्यांच्याकडील दुचाकीवरून दिघंची मार्गे महूदकडे येत होते. अज्ञात वाहन चिकमहूदहून दिघंचीकडे निघाले होते. या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने दुचाकीवरील एकजण जागीच मयत झाला तर दुसर्‍या युवकाचा उपचारादरम्यान दवाखान्यात मयत झाला.
यावेळी सागर जावीर, वैभव वाघमारे यांच्यासह उपस्थित नागरिकांनी तात्काळ 108 या क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिकेला बोलावून घेतले. जखमी मंगेश पैसे यास रुग्णवाहिकेतून उपचारासाठी सांगोलाकडे पाठविण्यात आले. अज्ञात वाहन मोटारसायकल स्वारांच्या अंगावरून व डोक्यावरून गेल्याने सर्वत्र मांस व रक्ताचा सडा पडलेला होता.

ब्लॅक स्पॉट व वारंवार अपघात
पंढरपूर-मल्हारपेठ मार्गावरील चिकमहूद (ता. सांगोला) शिवारात येथे वळणावळणाचा धोकादायक रस्ता आहे. येथे यापूर्वीही अनेक वेळा अपघात होऊन अनेकांचा बळी गेलेला आहे. हा ब्लॅक स्पॉट दुरुस्त करण्याबाबत कार्यवाही व्हावी, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.

COMMENTS