Homeमहाराष्ट्रसातारा

फलटण-पुणे डेम्यू रेल्वेचे मंगळवारी उद्घाटन

रेल्वे प्रशासनाने अत्यावश्यक सेवेतील लोकांच्या सोयीसाठी फलटण ते पुणे आणि परती साठी डेम्यू रेल्वे सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

वृषाली कडलग यांना नॅशनल वुमन्स एक्सलन्स अवॉर्ड प्रदान
 बारावे घनकचरा प्रकल्पातील कचऱ्याला लागलेल्या आगेवर नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशामक दलाचे शर्तीचे प्रयत्न सुरू
अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांची चार दिवसासाठी पोलीस कोठडीत रवानगी; मराठा आरक्षण आंदोलनादरम्यानचे वक्तव्याने अडचणींत वाढ

फलटण / प्रतिनिधी : रेल्वे प्रशासनाने अत्यावश्यक सेवेतील लोकांच्या सोयीसाठी फलटण ते पुणे आणि परती साठी डेम्यू रेल्वे सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. फलटण-पुणे दरम्यान अनारक्षित डब्यांची ही नियमित डेम्यू सेवा बुधवार, दि. 31 मार्च पासून सुरु होईल.

तत्पूर्वी मंगळवार, दि. 30 मार्च रोजी याच मार्गावर उद्घाटन विशेष गाडी चालविण्यात येणार आहे. या विशेष गाडीचे उद्घाटन केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते व्हिडिओ लिंकद्वारे हिरवा झेंडा दाखवून फलटण स्टेशन येथून गाडी रवाना केली जाईल. ही गाडी सुरवडी, लोणंद, नीरा, जेजुरी आणि सासवड रोड स्टेशनवर थांबेल.

अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी फलटण-पुणे अनारक्षित डेम्यू गाडीची नियमीत सेवा बुधवार, दि. 31 मार्चपासून सुरु होईल. गाडी क्रमांक 01435 पुणे येथून 05.50 वाजता सुटेल व 09.35 वाजता फलटणला पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 01436 फलटण येथून 18.00 वाजता सुटेल व पुणे येथे 21.35 वाजता पोहोचेल. ही गाडी सुरवडी, लोणंद, नीरा, जेजुरी व सासवड रोड स्टेशनवर थांबेल. रविवारच्या दिवशीी ही सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याचेही यावेळी जाहिर करण्यात आले आहे. 

राज्य शासनाने स्थानिक प्रशासकीय स्तरावर अत्यावश्यक सेवेतील संबंधीत लोकांना फलटणचे प्रांतअधिकारी यांच्याकडून क्यूआर कोड आधारित ओळखपत्रे / पास दिले जातील. पुणे पोलिस आयुक्तांना नोडल ऑफिसर म्हणून नेमण्यात आले आहे. जे संपूर्ण प्रक्रिया पुर्ण करुन क्यूआर कोड आधारित ओळखपत्रे / पास जारी करतील. प्रांतअधिकारी फलटण व पोलीस आयुक्त पुणे अत्यावश्यक सेवेतील लोकांची ओळख पटवून त्यांना ओळख पत्र जारी करतील. ही ओळखपत्रे क्यू आर कोड आधारित / पास आधारित असतील. अत्यावश्यक सेवेतील लोक स्टेशनवर क्यू आर कोड आधारित ओळखपत्र / पास दाखवून तिकीट खरेदी करुन प्रवास करु शकतात.

COMMENTS