Homeमहाराष्ट्रसातारा

आदेशाचा भंग केल्याने सातार्‍यातील चार हॉटेल व्यावसायिकांवर गुन्हे दाखल

सातारच्या जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशाचा भंग करत रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवल्याप्रकरणी सातारा शहर आणि तालुका पोलिसांनी चार जणांवर गुन्हे नोंदविले आहेत.

कराड पालिका अनुकंप प्रतिक्षा यादीतील कर्मचार्‍यांची नियुक्तीची प्रतिक्षा संपली
20 लाखाचे आमीष दाखवून 17 लाखाला घातला गंडा…
तीन महिन्याच्या गर्भवती वनरक्षक महिलेस माजी सरपंचाकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण |

सातारा / प्रतिनिधी : सातारच्या जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशाचा भंग करत रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवल्याप्रकरणी सातारा शहर आणि तालुका पोलिसांनी चार जणांवर गुन्हे नोंदविले आहेत. 

सातारा शहर पोलिस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी शहरात  जिल्हा परिषद चौकातील नेशन 11 या हॉटेलवर कारवाई करत केतन भिकू कदम (रा. बाँबे रेस्टॉरंट चौक) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याचदरम्यान कोरेगाव रस्त्याला विसावा नाका येथील प्रगती चायनीज या हॉटेलवर कारवाई केली. याप्रकरणी सतीश सुरेश फरांदे (रा. सदरबझार) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोडोली चौकात असणार्‍या विसावा चायनीज या ठिकाणावर सातारा शहर पोलिसांनी, तसेच वडूथ (ता. सातारा) येथील सेव्हन स्टार हॉटेलवर सातारा तालुका पोलिसांनी काल रात्री कारवाई केली. याप्रकरणी सनी संजय भिसे (रा. एमआयडीसी, सातारा) याच्यावर सातारा शहर, तर सचिन विश्‍वासराव निकम (रा. वडूथ) याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS