मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी चौघांना अटक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी चौघांना अटक

मुंबई/प्रतिनिधी ः मुंबईत 1993 साली झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटप्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून, याप्रकरणी गुजरात एटीएसने कारवाई करत मुंबईतून चौघांना

कोंबड्यामागं धावण पडलं महागात; बहीण-भावाचा मृत्यू l DAINIK LOKMNTHAN*
डीजी परमेश शिवमणी यांनी तटरक्षक दलाच्या महासंचालकपदाचा स्वीकारला पदभार
अवघ्या काही सेकंदांच्या फरकामुळे थोडक्यात बचावला साऊथ सुपरस्टार

मुंबई/प्रतिनिधी ः मुंबईत 1993 साली झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटप्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून, याप्रकरणी गुजरात एटीएसने कारवाई करत मुंबईतून चौघांना अटक केली आहे.अटक करण्यात आलेल्या चौघांची एटीएसकडून कसून चौकशी केली जाणार आहे. मुंबईत 1993 साली झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी आज चार जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या चौघांच्या चौकशीतून महत्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
1993 साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील मोस्ट वॉन्टेड आरोपी असलेला दहशतवादी अबू बकरकला तब्बल 29 वर्षांनी संयुक्त अरब अमिरातमधून अटक करण्यात यश मिळालं होतं. यानंतर आता गुजरात एटीएसनं आणखी चार जणांना या बॉम्बस्फोटाप्रकरणी पकडलं आहे. 1993 साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाने संपूर्ण देशाला हादरवलं होतं. देशातील सर्वात मोठा बॉम्बस्फोट म्हणून मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट ओळखला जातो. यामध्ये एकूण 257 जणांचा मृत्यू झाला होता. तर 700 हून अधिक जण जखमी झाले होते. अबू बकर हा दाऊद इब्राहिमचा अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो. सन 1997 मध्ये अबू बकर याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. अबू बकरचे दुबईमधील अनेक छोट्या मोठ्या व्यावसायिकांशी हितसंबंध असल्याचे सांगितले जात आहे. सन 2019 मध्ये बकरला अटकही करण्यात आली होती. मात्र, काही कागदपत्रांच्या अडचणींमुळे तो यूएई अधिकार्‍यांच्या ताब्यातून सटकण्यात यशस्वी झाला होता. आता त्याला पुन्हा एकदा अटक करण्यात आली असून, लवकरच भारतात आणले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

COMMENTS