छत्रपती संभाजीराजांना नगरमध्ये अभिवादन…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छत्रपती संभाजीराजांना नगरमध्ये अभिवादन…

प्रोफेसर कॉलनी चौकात पुतळा उभारणार: आ. जगताप

अहमदनगर/प्रतिनिधी : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा मराठा सेवा संघाच्यावतीने महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्या

पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून एकास बेदम मारहाण 
gevrai : पंतप्रधान गरीब कल्याण योजना अंतर्गत आमदार लक्ष्मण पवार यांच्या हस्ते मोफत धान्य वाटप l LokNews24
विद्यार्थ्यांना संधी मिळण्यासाठी वाणिज्य मंडळाची गरज ः  प्राचार्य डॉ. भोर

अहमदनगर/प्रतिनिधी : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा मराठा सेवा संघाच्यावतीने महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना, सावेडीच्या प्रोफेसर कॉलनी चौकात लवकरच धर्मवीर संभाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारू, असे आश्‍वासन आ.संग्राम जगताप यांनी यावेळी दिले.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती नगरमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. सावेडीच्या प्रोफेसर कॉलनी चौक येथे संभाजी राजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी आ. जगताप ,जिल्हा मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष इंजि. सुरेश इथापे, नगरसेवक स्वप्नील शिंदे, माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, उदय अनभुले, सतीश इंगळे, जल अभियंता परिमल निकम, इंजि.सुनील जाधव, अ‍ॅड. अनुराधा येवले, सचिन जगताप, राहुल साबळे, अ‍ॅड.मंगेश सोले उपस्थित होते. यावेळी बोलताना आ. जगताप म्हणाले, धर्मवीर संभाजी महाराजांचे कार्य आजच्या युवकांना प्रेरणादायी आहे. लवकरच प्रोफेसर कॉलनी चौक येथे धर्मवीर संभाजी महाराज व्यापारी संकुलाचे काम मार्गी लावू व त्या आवारामध्ये धर्मवीर संभाजीराजांचा भव्य-दिव्य पुतळा उभारू. यासाठी प्रशासकीय प्रक्रिया सुरू असून लवकरच हा प्रश्‍न मार्गी लागेल, असे ते म्हणाले. धर्मवीर संभाजी महाराजांचे विचार आजच्या युवकांनी आत्मसात करावे असे आवाहनही त्यांनी केले. इथापे यांनी प्रास्ताविकात संभाजीराजांच्या जीवन चरित्राची माहिती दिली. ते म्हणाले की, धर्मवीर संभाजीराजे हे शूरवीर राजे होते. त्यांची ख्याती सातासमुद्रापार पसरली होती. धर्मवीर म्हणून त्यांची ओळख होती. मोगलांनी चाळीस दिवस धर्मवीर संभाजी राजेंना कैदेत ठेवले होते तरीही त्यांनी शरणागती पत्करली नाही. छत्रपती संभाजी महाराज यांच्या अनेक पराक्रमांची इतिहासमध्ये नोंद आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी एकूण 13 भारतीय आणि विदेशी भाषांचे ज्ञान घेतले होते. त्यात मराठी, संस्कृत, इंगजी, हिंदी आणि पोर्तुगिज या सारख्या भाषांचा समावेश आहे. अनेक भाषांवर आपले प्रभुत्व मिळवणारे, धर्म अभिमानी, संस्कृत पंडित, पराक्रमी, व्यासंगी, शूरवीर अशी अनेक विशेषज्ञ देऊनही ज्यांच्या कीर्तीचे वर्णन करताना शब्द अपुरे पडतात, असा छत्रपती संभाजीराजे भोसले यांचा इतिहास आहे, असे ते म्हणाले.

राष्ट्रवादीद्वारे अभिवादन
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष अमित खामकर, उद्योजक अफजल शेख, दीपक खेडकर, स्वप्नील शिंदे, विजय वडागळे, सुनील उमाप, मुन्ना गट्टाणी, गणेश बोरुडे, लहू कराळे, बाबुशेठ जपकर, मनीष फुलडहाळे, नाना पांडुळे, मतीन ठाकरे आदी उपस्थित होते. आत्ताच्या युवकांना संभाजीराजेंचा पराक्रमाचा इतिहास सांगण्याची गरज आहे, असे प्रा. विधाते यावेळी म्हणाले. राजकारण धुरंदर, विज्ञान व अफाट शौर्य असलेले संभाजी राजे यांचा आदर्श आजच्या युवकांना प्रेरणादायी आहे. संभाजी राजे यांचा खरा इतिहास लपवला गेला. स्वराज्याच्या रक्षणासाठी संभाजीराजांनी लढा देऊन दिलेले बलिदान न विसरता येणारे असल्याचे प्रतिपादन प्रा. विधाते यांनी केले.

COMMENTS