धक्कादायक ! पाच महिलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धक्कादायक ! पाच महिलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

लातूर/प्रतिनिधी : ऊस तोडणीसाठी आलेल्या महिला सकाळी धुने धुण्यासाठी लातूर जिल्ह्यात असलेल्या अहमदपूर तालुक्यातील तुळसिराम तांडा येथील तलावावर गेल्या अ

प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
कॅन्टोमेंट बोर्डाला साडेचार कोटी रुपयाचे निधी मंजूर
बार मालकाकडून माजी नगरसेवकावर हल्ला l LOKNews24

लातूर/प्रतिनिधी : ऊस तोडणीसाठी आलेल्या महिला सकाळी धुने धुण्यासाठी लातूर जिल्ह्यात असलेल्या अहमदपूर तालुक्यातील तुळसिराम तांडा येथील तलावावर गेल्या असताना एकमेकीला वाचवण्याच्या प्रयत्नात पाच महिलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 14 मे रोजी घडली आहे. याविषयी अधिक माहिती अशी की ऊस तोडणीच्या कामासाठी आलेल्या रामपूर तांडा तालुका पालम जिल्हा परभणी येथील रहिवासी असलेल्या या ऊसतोड महिला आज दि 2मे रोजी सकाळी तुळशीराम तांडा येथे असलेल्या तलावात धुने धुण्यासाठी गेल्या होत्या  धुणे धूत असताना ऐकीचा पाय घसरून पाण्यात पडली पाण्यात बुडत असताना तिला वाचवण्यासाठी इतर चौघेही पाण्यात पडल्या त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मयता मध्ये  राधाबाई धोंडीबा आडे वय 45 वर्ष,दिशा धोंडीबा आडे वय 22 वर्ष,काजल धोंडीबा आडे वय 19, व एकोणीस वर्षे राठोड सुषमा संजय वय 22 वर्षे रा.लेडेगाव तांडा  अरूणा गंगाधर वय 26 वर्षे या पाच जणी चा समावेश आहे. या घटनेची माहिती एका मोटरसायकल तेथून जात असताना लहान मुलाच्या रडण्याचा ओरडण्याचा आवाज आल्याने त्याचे लक्ष तिकडे वेधले त्यांनी ही घटना तांडयातील लोकांना सांगितली लोक जमा झाले त्यांनी तलावाजवळ येऊन तलावात बुडालेल्या बाहेर काढले या घटनेची माहिती किनगाव पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलीस जमादार रामचंद्र गोखरे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा करून अकस्मीत मृत्यूचा गुन्हा किनगाव पोलिसात नोंद करून पुढील तपास रामचंद्र भोकरे हे करीत आहेत

COMMENTS