असानी चक्रीवादळामुळे राज्यात ढगाळ वातावरण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

असानी चक्रीवादळामुळे राज्यात ढगाळ वातावरण

मुंबई/प्रतिनिधी : पश्‍चिम बंगालच्या खाडीत निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे असनी चक्रीवादळ निर्माण झाले आहे. या चक्रीवादळाचा मोठा फटक

’मविआ’ ची दलाली आणि कमिशन खोरी मोडीत काढली
देशात एकाधिकारशाहीचे राजकारण सुरू ः ज्ञानदेव वाफारे
तिहेरी हत्याकांडामुळे उत्तर प्रदेश हादरलं! 

मुंबई/प्रतिनिधी : पश्‍चिम बंगालच्या खाडीत निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे असनी चक्रीवादळ निर्माण झाले आहे. या चक्रीवादळाचा मोठा फटका आंध्रप्रदेश राज्याला बसला. आंध्रप्रदेशात जोरदार पाऊस झाला, तर महाराष्ट्रात मात्र बुधवारी ढगाळ वातावरण बघायला मिळाले. कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाडा या भागासह मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, कर्नाटक आणि केरळमध्ये सुद्धा दिवसभर ढगाळ वातावरण होते.
असनी चक्रीवादळाने बुधवारी आंध्रप्रदेशच्या दिशेने वाटचाल सुरु केली असून, हवामान विभागाने आंध्रप्रदेशातील तीन जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला होता. याच दरम्यान या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातील काही भागांत जाणवणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे. सकाळच्या सुमारास असनी चक्रीवादळ हे काकीनाडा आणि विशाखापट्टनमच्या किनारपट्टीच्या भागात धडकेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या दरम्यान वादळी वारे ताशी 100 किलोमीटर वेगाने वाहू शकतात, मुसळधार पाऊस पडू शकतो. आंध्रप्रदेशातील पूर्व गोदावरी, पश्‍चिम गोदावरी आणि यनम या तीन जिल्ह्यांना रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. चक्रीवादळ वेगाने आंध्रप्रदेशच्या दिशेने कूच करत आहे. या काळात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती 12 मे पर्यंत राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, बुधवारी सकाळपासूनच मुंबईसह मराठवाडा, कोकणात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. कोकण, गोव्यात या ठिकाणी सध्या वातावरण ढगाळ आहे. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी देखील कोसळल्या. 11 ते 13 मेदरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण किनारपट्टीला भारतीय हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. या भागात हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. मच्छीमारांना देखील सतर्क राहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पार्श्‍वभूमीवर मच्छिमारांच्या नौका देखील सुरक्षितरित्या किनार्‍यावर उभ्या करण्यात आल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल दिसत आहे. उष्णतेचा दाहकता देखील कमी झाली आहे.

राज्यात ‘या’ भागावर चक्रीवादळाचा प्रभाव
असनी चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्रातील कोकणात, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागावर जाणवण्याची शक्यता आहे. या भागात ढगाळ वातावरण असणार आहे. यासोबतच मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली या परिसरातही असनी चक्रीवादळाचा परिमाण जावण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. वातावरणात झालेल्या बदलामुळे कोकणात आंबा, काजू आणि मच्छिमारीवर परिणाम होत आहे. सध्या मच्छीच्या दरांमध्ये देखील वाढ झाल्याचे चित्र स्थानिक बाजारपेठेत दिसत आहे.

COMMENTS