सांगली / प्रतिनिधी : आपत्तीत बाधित होणार्या नागरिकांना तत्काळ मदत व त्यांच्या पुनर्वसनासाठी सांगली जिल्ह्यात आपत्ती प्रतिसाद यंत्रणेची अंमलबजावण
सांगली / प्रतिनिधी : आपत्तीत बाधित होणार्या नागरिकांना तत्काळ मदत व त्यांच्या पुनर्वसनासाठी सांगली जिल्ह्यात आपत्ती प्रतिसाद यंत्रणेची अंमलबजावणी केली जाईल, त्याचे जिल्ह्यातील यंत्रणांना प्रशिक्षण द्या, जिल्ह्यातील पुराचा वाढता धोका विचारात घेता ‘एनडीआरएफ’ आणि ‘एसडीआरएफ’ची पथके कायमस्वरूपी तैनात करा, असे आदेश आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी नुकतेच दिले.
सांगली जिल्ह्याच्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. कोल्हापूरसह सांगली, सातारा, पुणे व सोलापूर आणि कोकण विभागातील जिल्ह्यांचा त्यांनी ऑनलाईन बैठकीद्वारे आढावा घेतला.
सर्व प्रशासकीय यंत्रणांनी मान्सूनपूर्व कामे गतीने करावीत. त्याचबरोबर अचानक येणारी वादळे व पूरामुळे होणारी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी, बाधित होणार्या नागरिकांना तत्काळ मदत व पुनर्वसन करण्यासाठी राज्यात आपत्ती प्रतिसाद यंत्रणेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. याचे सर्व जिल्हास्तरीय यंत्रणांना प्रशिक्षण द्यावे, असे निर्देश आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.
या बैठकीला विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, आपत्ती व्यवस्थापन संचालक संजय धारूरकर, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलशे बलकवडे, निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्यासह अन्य जिल्ह्यांतील अधिकारी उपस्थित होते.
आपत्ती प्रतिसाद यंत्रणा कोल्हापूरसह संपूर्ण राज्यात लागू करणार. एका सॉफ्टवेअरवर सर्व विभागांकडून सर्व माहिती भरणार. माहितीच्या आधारे मॅप तयार होणार. जितकी जास्त माहिती तितकी जास्त मदत होणार. सर्व यंत्रणांना याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यावर्षीही सरासरीपेक्षा जास्त व वेळेपूर्वी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे आपत्ती निवारणाची कामे पावसाळ्यापूर्वी करा. स्थानिक यंत्रणा गतिमान करा. नागरीकरण मोठ्या प्रमाणात असलेल्या ठिकाणी नाले सफाई, धोकादायक वृक्ष, फांद्या तोडणे, रस्ते दुरुस्ती, बांधकाम पूर्ण करा. कोल्हापुरात पुराचा धोका लक्षात घेता राज्य आपत्ती प्रतिसाद दल व राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची पथके कायमस्वरूपी ठेवा. आपत्तीत मदतीसाठी साहसी पथकांची नियुक्ती करा. त्यांचे दूरध्वनी क्रमांक अद्ययावत करा. अद्ययावत वाहने, साहित्य मागणीचे प्रस्ताव देण्याचे आदेश दिले. पावसाची तीव्रता वाढल्यास दरडप्रवण क्षेत्रातील नागरिकांसाठी तात्पुरती निवारा केंद्रे आतापासूनच तयार करा. पूरप्रवण गावे, नदीकाठच्या गावांचा संपूर्ण अभ्यास करा. यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करा. प्रत्येक गावाचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा करण्याचे निर्देशही वडट्टीवार यांनी दिले आहेत.
COMMENTS