पाचगणी / वार्ताहर : गेल्या वर्षी जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने महाबळेश्वर पश्चिम पट्ट्यात अक्षरशः धुमाकूळ घातला. त्यामध्ये मकरंद गडाच्या प
पाचगणी / वार्ताहर : गेल्या वर्षी जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने महाबळेश्वर पश्चिम पट्ट्यात अक्षरशः धुमाकूळ घातला. त्यामध्ये मकरंद गडाच्या पायथ्याशी असणारे हातलोट गाव आज त्याच्या यातना भोगत आहेत. जीवनावश्यक असणार्या पाणी स्तोत्राची विहिर बुजून गेली. शेतात जाणारा ओढ्यावरील पुल पुराने वाहून गेला. शेती तर भुईसपाट झाली आता पुन्हा पावसाळा तोंडावर आला आहे. आता शेती करावी म्हंटल तर वाहून गेलेल्या शेतीकडे हताश होवुन पहाण्यापलीकडे काहीच करता येत नाही. कारण अतिवृष्टीुळे झळ बसलेल्या हातलोट शासकीय यंत्रणेने डोकावूनही पाहिले नसल्याने परिस्थिती जैसे थेच आहे. आता शेतीच नसल्याने नक्की काय करायचे असा यक्ष प्रश्न या हातलोट ग्रामस्थांच्या समोर आ वासून उभा आहे.
हातलोट हे महाबळेश्वर तालुक्यातील निसर्गरम्य मकरंद गडाच्या वातावरणात पायथ्याशी वसलेले आणि सातारा व रत्नागिरी जिल्ह्याच्या सरहद्दीवर तीनशे ते चारशे लोकवस्तीचे गाव गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यातील अतिवृष्टीुळे गावची पाण्याची विहीर, शेतात जाण्याकरिता असणारा ओड्यावरील पुल तसेच डोंगरउतारावरून आलेल्या मलब्याने आणि पाण्याच्या प्रवाहाने पूर्ण शेती उध्वस्त झाली आहे. अतिवृष्टीला दहा महिने पूर्ण झाले असून अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आज जैसे थे आहे. काही ठिकाणी शेतांच्या किरकोळ दुरुस्त्या झाल्या. मात्र, हातलोट वासियांचे काय..? त्यांच्याकडे अजून कोणतीच सुविधा पोहचली नाही. आता पावसाळा तोंडावर आला. पुढे या परिसरात पडणार्या धो-धो कोसळणारा पावसाचे पाणी पिवून जागायचे का अशा प्रश्न हातलोट वासिय ग्रामस्थ करत आहेत.
चोहो बाजूंनी वेढलेल्या जंगलाच्या कुशिमध्ये हातलोट गाव वसले आहे. चारी दिशांना जंगल उतार आहे. गावच्या पाणवठ्याची विहीर अतिवृष्टीुळे आलेल्या मलब्याने पाण्याची मुजून गेली आहे. आता ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरु आहे. विहरितील मलबा काढून तेच पाणी सद्या गावकरी पिण्यास वापरत आहेत. पुल वाहून गेल्याने पावसाळ्यात रानात जाण्याची अडचण होणार आहे. मात्र, लोकप्रतिनिधींनी याकडे अजूनही डोकावून पाहिले नाही. त्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होवू शकतो. अतिवृष्टीत हातलोट गावाकडे जाणार्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. पुन्हा पावसाळा सुरू होताच वाहतुक व्यवस्था कोलमडून पडणार आहे. अनेक ठिकाणी वाहून गेलेल्या मोर्या पुल दुरुस्त केले गेले नाहीत. फक्त रस्त्यावरील मलबा दूर करून वाहतुक सुरू केली आहे. पावसाळ्यात ती पुन्हा बंद पडू शकते.
चौकट:
22 जुलै 2021 रोजी झालेल्या अतिवृष्टीने सर्वत्र हाहाकार झाला होता. त्याची झळ मोठ्या प्रमाणात महाबळेश्वर तालुक्याच्या पश्चिम भागाला सर्वाधिक बसला आहे. हे कोयनेचे बॅक वॉटर ठिकाण आहे. सर्वत्र डोंगर उतार असल्याने अनेक रस्ते पूल शेती पूर्णपणे उध्वस्त होवून गेली आहे. काही ठिकाणी थोडीफार शेतीचे दुरुस्ती करून दिली आहे. हाटलोट सारख्या दुर्गम भागात अजूनही कोणतीही सुविधा पोहचली नाही..
प्रतिक्रिया:
22 जुलैच्या अतिवृष्टीस आजमितीस दहा महिने उलटून गेले आहेत. आज ही आम्ही त्याच परिस्थितीत जैसे थे आहोत. आमच्याकडे कोणतीही शासकीय यंत्रना पोहचली नाही. किंवा विचारपूसही केली नाही. आज आम्ही ग्रामस्थ खूप अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या यातना भोगतोय. आमच्या गावात येणारी एसटी बंद आहे. विद्यार्थ्यांना 25 ते 30 किलोमीटर अंतरावर शाळा आहे. पावसाळ्यापूर्वी सर्व दुरुस्त्या होणे अपेक्षित होते. मात्र, शासकीय उदासिनाता दिसून येत आहे. लोकप्रतिनिधी आणि शासनकर्त्यांना याचे गांभीर्य नाही.
शशिकांत मोरे
सरपंच हातलोट, ता. महाबळेश्वर
प्रतिक्रिया:
महाबळेश्वर तालक्यातील पश्चिम भागात अतिवृष्टी होवून दहा महिने उलटले असून आज अनेक ठिकाणी नुकसानग्रस्त भागात परिस्थिती जैसे थे आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या जखमा त्याचे व्रण आज त्या परिस्थितीची जाणीव करून देत आहेत. यावरून निदर्शनास येतेय की किती भयावह परिस्थिती आहे. आज लोकांना उभे रहाण्याकरीता शासकीय यंत्रणेची नितांत गरज आहे.
मधुकर बिरामणे महाबळेश्वर
तालुका अध्यक्ष भाजप महाबळेश्वर
COMMENTS