सैनिक बँकेच्या भ्रष्टाचार प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सैनिक बँकेच्या भ्रष्टाचार प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी

अहमदनगर/प्रतिनिधी : पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेतील आर्थिक घोटाळा दडपण्यासाठी सहकार विभागातील उपनिबंधक सहकार आयुक्त निबंधक कार्यालय पुणे, तत्काली

कनगर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी बाळासाहेब गाढे  
सासवडमध्ये शिर्डीतील भाविकांकडून पुरणपोळी आमरसाची वारकर्‍यांना पंगत
महर्षी शाळेचा उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

अहमदनगर/प्रतिनिधी : पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेतील आर्थिक घोटाळा दडपण्यासाठी सहकार विभागातील उपनिबंधक सहकार आयुक्त निबंधक कार्यालय पुणे, तत्कालीन सहाय्यक निबंधक पारनेर, वरिष्ठ अधिकारी जिल्हा उपनिबंधक कार्यालय अहमदनगर, वरिष्ठ अधिकारी जिल्हा उपनिबंधक कार्यालय अहमदनगर, जिल्हा विशेष लेखापरीक्षण वर्ग 1 अहमदनगर या शासकीय अधिकार्‍यांच्या साखळीने मदत केल्याचा आरोप करुन विभागीय सहनिबंधक आर.सी. शाह यांच्या चौकशीत दोषी ठरलेल्या बँक संचालक, कर्मचारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन पारनेर सैनिक बँक बचाव कृती समितीच्या वतीने बँकेचे सभासद कॅप्टन विठ्ठल वराळ, मारुती पोटघन, बाळासाहेब नरसाळे, विनायक गोस्वामी, संपत शिरसाट यांनी सहकार आयुक्त अनिल कवडे यांना दिले. दोषी कर्मचारी आधिकारी यांना बडतर्फ करुन त्यांच्यावर फौजदारी कारवाई होण्यासाठी सहकार आयुक्त कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
सहकार आयुक्त यांना देण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे की, पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेतील जागृक सभासद अनेक वर्षे बँकेतील झालेल्या भ्रष्टाचार, अपहार बाबत तक्रारी करत होते. त्या तक्रारीवर पारनेर तालुका सहाय्यक निबंधक कार्यालय, जिल्हा उपनिबंधक अहमदनगर कार्यालय व सहकार आयुक्त कार्यालयातील या तीन विभागातील कर्मचार्‍यापासून ते अधिकार्‍यापर्यंत या सर्वांनी सैनिक बँकेतील मुख्यकार्यकारी आधिकारी संजय कोरडे व संचालक मंडळ यांच्याशी आर्थिक देवाण-घेवाण करत सदर तक्रारी दडपल्या व काहींची थातुरमातुर तपासणी करत सदर प्रकरणांचा निपटारा केला होता. त्यामुळे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लक्ष घालत बँकेतील सर्व तक्रारींची सहकार आयुक्तांना पत्र देत चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार नाशिक विभागीय सहनिबंधक आर.सी. शाह यांनी चौकशी केली. त्या चौकशी अहवालात बँक संचालक, कर्मचारी, आधिकारी यांना दोषी धरत त्यांच्यावर कारवाई करण्याची सहकार आयुक्त पुणे यांच्याकडे शिफारस केली होती. त्यानुसार बँकेची कलम 83 ची चौकशी सुरु असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
आर.सी शाह यांच्या अहवालानुसार त्वरित कारवाई व्हावी, बँकेच्या संचालक नातेवाईकांना पुन्हा-पुन्हा कामावर घेतले जात  असल्याने त्यांना त्वरित कामावरून कमी करावेत, एकाच दिवशी नियमबाह्य केलेले 1405 सभासद अपात्र घोषित करून त्यांची नावे बँक सभासद रजिस्टर मधून कमी करण्याचा निर्देश बँकेला व्हावा, सैनिक बँकेतील भ्रष्टाचाराला पाठीशी घालणारे सहकार विभागातील शासकीय आधिकारी, कर्मचारी यांचे बडतर्फ व्हावे, निराधार योजनेतील रक्कम हडप करणारा भ्रष्ट कर्मचारी सदाशिव फरांडे याला शहा यांच्या अहवालातील शेर्‍यानुसार बँकेतून बडतर्फ करावे, संचालक मंडळावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. सहकार आधिकारी व सैनिक बँक आधिकारी, संचालक मंडळावर कारवाई होण्यासाठी जिल्हातील माजी सैनिक संघटना, सैनिक बँक सभासद, उपोषणास बसणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त बँक सभासद व माजी सैनिकांनी सहभागी होण्याचे आवाहन पारनेर सैनिक बँक बचाव कृती समिती कडून करण्यात आले आहे.

COMMENTS