पैशाचे आमिष दाखवून वृद्धाचे 91 हजाराचे दागिने पळवले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पैशाचे आमिष दाखवून वृद्धाचे 91 हजाराचे दागिने पळवले

अहमदनगर/प्रतिनिधी : सणाच्या निमित्ताने गरीबांना पैसे मिळत आहेत, तुम्ही गरीब दिसले पाहिजेत.. म्हणत, अनोळखी व्यक्तीने अंगावरील सोन्याचे डाग काढून पाकिट

कर्मवीर काळे यांच्या जयंतीनिमित्त ‘महाराष्ट्राचा हास्य कल्लोळ’ कार्यक्रम
दूधगंगा गैरव्यवहार प्रकरणी व्यवस्थापक अटकेत
संगमनेर मध्ये फॉरेस्ट अधिकाऱ्यांची मक्तेदारी कर्मचाऱ्यास कामावर येण्यास मज्जाव 

अहमदनगर/प्रतिनिधी : सणाच्या निमित्ताने गरीबांना पैसे मिळत आहेत, तुम्ही गरीब दिसले पाहिजेत.. म्हणत, अनोळखी व्यक्तीने अंगावरील सोन्याचे डाग काढून पाकिटात ठेवायला सांगितले आणि ते 91 हजाराचे दागिने हातचलाखीने त्या भामट्याने लंपास केले. ही घटना श्रीगोंदा तहसील कार्यालयाच्या आवारात घडली. याबाबतची माहिती अशी की, श्रीगोंद्यात सोमवारी दि. 2 मे रोजी होळी गल्ली येथील रहिवासी असलेल्या पापाभाई रहेमान सय्यद यांना व त्यांच्या पत्नी चाँदबी पापा भाई सय्यद यांना श्रीगोंदा तहसीलमध्ये नेऊन एका अनोळखी व्यक्तीने मुलांची ओळख सांगत उद्या असलेल्या रमजान ईद सणानिमित्त सरकार 10 हजार रुपये देत आहे, यासाठी अंगावरील दागिने काढून ठेवा. तुम्ही गरीब वाटले पाहिजेत, असे त्यांना सांगून त्यांनी रोख रक्कम आणि दागिने पाकिटात ठेवल्यानंतर नजर चुकवून ते लंपास केले आहेत. याबाबत पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी नमूद केले आहे की, त्या व्यक्तीने चाचाला सोबत घेऊन तहसील कार्यालयासमोरील झेंड्याखाली बसवले. अंगावरील दागिने काढून दागिन्याचे पाकिट चाचाकडे दिले. त्यांना घेऊन तो व्यक्ती तहसील कार्यालयाच्या गेटजवळ गेला. काही वेळाने चाचा परत आले व त्यांनी त्या अनोळखी व्यक्तीने दागिन्यांचे पाकीट तुझ्याकडे दिले का? असे विचारले. तो परत आला नाही म्हटल्यावर मात्र पाकीट चोरीला जाऊन आपली फसवणूक झाल्याचे व विश्‍वासाघात करून अनोळखी व्यक्तीने दागिने चोरल्याची त्यांची खात्री पटली. यावरून श्रीगोंदा पोलिस स्टेशनला सय्यद यांनी त्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

फसवणुकीचा नेहमीचा प्रकार
शेजारी चोर आले आहेत, अंगावरील दागिने काढून रुमालात ठेवा तसेच आता समोर दोन लोकांना पोलिसांनी चोरी करताना पकडले आहे, तुम्ही सोन्याचे दागिने काढून रुमालात ठेवून खिशात ठेवा, असे म्हणत सामान्य लोकांना हातचलाखीने लुटण्याचे प्रकार अनेकदा श्रीगोंदा शहरात घडले आहेत. त्यातीलच हा एक प्रकार असल्याचे समोर आले आहे.

COMMENTS