गोबेल्स ग्लोबल केला जातोय का ?

Homeताज्या बातम्यासंपादकीय

गोबेल्स ग्लोबल केला जातोय का ?

खोटा इतिहास सांगून समाजाला दिशाभूल करीत पेशवाई समकक्ष सत्तेची स्वप्न पाहणारे आता केवळ औरंगाबाद च्या सभेतूनच प्रकटतात, असे नव्हे, तर, अशा लोकांचा एक ज

’माझे पुणे, स्वच्छ पुणे’ अभियानाचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
अशोक सराफ, विजय चव्हाण, देवकी पंडित व कलापिनी कोमकली राष्ट्रीय साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित
ड्रीम्स मॉल आगीचा चौकशी अहवाल सादर करण्यासाठी 15 दिवसांची मुदत

खोटा इतिहास सांगून समाजाला दिशाभूल करीत पेशवाई समकक्ष सत्तेची स्वप्न पाहणारे आता केवळ औरंगाबाद च्या सभेतूनच प्रकटतात, असे नव्हे, तर, अशा लोकांचा एक जागतिक ट्रेंड येऊ पाहतोय, असे चित्र आता जागतिक पातळीवर दिसू लागले आहे. कालच राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी टिळकांनी निर्माण केल्याचा धडधडीत खोटा इतिहास महाराष्ट्रातील जनतेसमोर मांडला, त्याची सखोल चिकित्सा झाली. त्यामुळे, खोटारडा इतिहास मांडणाऱ्यांची पुरती वैचारिक धुलाई महाराष्ट्राने केली. पण, तसाच काहीसा प्रकार आता रशियाचे विदेश मंत्री सर्जेई लॅवराव यांनी केले आहे. सध्या रशिया – युक्रेन युध्द सुरू असताना लॅवराव यांनी  हिटलरचे मुळ ज्यू असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर झेलेन्स्की यांचे मुळ हिटलरशी असल्याचे म्हटले आहे. मात्र, त्यांच्या या विधानावर जगभरातील नेत्यांनी आक्षेप घेत असा खोटारडा इतिहास मांडल्याबद्दल लॅवराव आणि रशिया यांनी माफी मागावी अशी मागणी इस्त्रायलसह अन्य देशांनी केली आहे. झेलेन्स्की यांनीही यावर तीव्र आक्षेप घेत दुसऱ्या महायुद्धातील विनाश जग अजून विसरलेले नाही, असे म्हटले आहे. रशियाने ज्यूंची माफी मागावी असे पत्र इस्त्रायल ने तात्काळ रशियन दूतावासाला दिले आहे. सहा मिलियन ज्यू लोकांचा वंशसंहार करणारा क्रूरकर्मा हिटलर हा जू कसा असू शकतो, असे सांगत हिटलरची ती क्रूरता जग अजूनही विसरलेले नाही, त्यामुळे रशियाने यासंदर्भात तात्काळ माफी मागावी, असेही त्यांनी म्हटले आहे. यावर अमेरिकेने देखील तिखट प्रतिक्रिया व्यक्त करित म्हटले की वर्तमान सत्ताधाऱ्यांनी अशा प्रकारचे नीच वक्तव्य करणे जगासाठी अतिशय धोकादायक असल्याचे म्हटले आहे. रशियन विदेश मंत्र्याच्या वक्तव्यावर जगभरातून अतिशय कठोर टीका होत आहे.‌ तोच महाराष्ट्रातही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी उभारण्यासंदर्भात करण्यात आला. त्यामुळे, हिटलरने ज्या गोबेल्स षडयंत्राचा वापर करून जगाला युद्धात नेऊन सोडले तीच गोबेल्स निती आता ग्लोबल करण्याचे धोरण आखले गेले आहे काय, अशी एक शंका मनात निर्माण झाली. दुसऱ्या महायुध्दानंतर जग मानव कल्याणाच्या उद्देशाकडे पूर्णपणे वळले. त्यामुळे जगभरात सामाजिक कल्याणाच्या योजना अंमलात आणल्या गेल्या. दुसरे महायुद्धानंतर जगात शांतता आणि समृद्धी या दोन्ही बाबी एकोप्याने नांदाव्या अशा संकल्पातून अनेक जागतिक संस्थांचा जन्म झाला. मात्र, दुसऱ्या महायुद्धानंतर जगाची विभागणी दोन गटात झाली होती; त्यातील एक गट हा समाजवादी अर्थव्यवस्थेचा तर दुसरा गट भांडवली अर्थव्यवस्थेचा! नव्वदीच्या दशकात सोवियत युनियन म्हणून रशियाचे पतन झाले आणि अमेरिकेने भांडवलशाही च्या दिशेने जगाला खेचण्याचे डावपेच आखले. आज जग आणि सर्व जागतिक सत्ता भांडवलदारांच्या आधीन झाल्या आहेत. तर, महाराष्ट्रात खोतांची जुल्मी सत्ता मोडून काढणाऱ्या शेतकरी आणि बहुल हिंदू जातींना ज्या पेशवाईत पिळून काढले होते त्यांच्या पुरस्कर्त्यांना थेट ऐतिहासिक नायक ठरविण्याचा राज ठाकरे यांचा प्रयत्न हा गोबेल्स नितीला ग्लोबल करण्याच भाग आहे, असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही. रशियाचे विदेश मंत्री ज्यू समाजाला टार्गेट करतयं तसं राज ठाकरे येथील अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाला टार्गेट करताना दिसताहेत. जागतिक पातळीवर सर्व जग रशिया विरोधात उभे राहिले आहे. परंतु, चार एप्रिल चा अल्टीमेटम देणाऱ्या राज ठाकरेंवर महाविकास आघाडी कठोर कारवाई करताना दिसत नाही. महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेसह शांतता नांदावी यासाठी सत्ताधारी आघाडी ने अधिक सजग राहणे गरजेचे आहे. वातावरण स्फोटक बनेपर्यंत ताणून ठेवणे योग्य नसून कायदा मोडण्याची धमकी देणाऱ्यांनाही कारवाई च्या कक्षेत आणायला हवे. 

COMMENTS