Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काटवली येथील पांचगणी मार्गावरील जुना दगडी पुल बनला धोकादायक

काटवली : जुन्या पुलाची झालेली दुरवस्था पाचगणी-पाचवड मार्गावर अनेक जुने पुल धोकादायक स्थितीतपाचगणी / वार्ताहर : पांचगणी-पाचवड मार्गावरील काटवली बस

हुंबरळी शाळेस कायमस्वरूपी शिक्षक न दिल्यास टाळे ठोकण्याचा इशारा
कोल्हापूर जिल्ह्यातील हसूरचंपू येथे अ‍ॅग्रो केमिकल्स कारखान्याला आग
वादळी वार्‍याने आनंददायी माध्यमिक निवासी आश्रमशाळेचे पत्रे उडाले; लाखो रुपयांचे नुकसान

पाचगणी-पाचवड मार्गावर अनेक जुने पुल धोकादायक स्थितीत
पाचगणी / वार्ताहर : पांचगणी-पाचवड मार्गावरील काटवली बस स्टॉप जवळू असणारा ओढ्यावरील जुना दगडीपुल धोकादायक झाला असून त्याकडे दुर्लक्ष झाल्यास मोठा अनर्थ घडू शकतो. या पुलाच्या व्यथेकडे काटवली येथील ग्रामस्थांनी लक्ष वेधत सार्वजनिक बांधकाम विभाग पश्‍चिम जावळी यांस निवेदन देवून पुलाच्या दुरवस्था निदर्शनास आणून दिली आहे. यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित लक्ष घालण्याची गरज आहे.
काटवली, ता. जावळी येथील बस स्टॉप जवळील पाचवड-पांचगणी मार्गावरील ओढ्यावरिल जुना दगडी पूल धोकादायक झाला आहे. त्याचा स्लॅब अनेक तुटून पडला आहे. दगडी बांधकामाला अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत. हा पूल खूप जुना असून त्याची कालमर्यादा संपली आहे. पूल धोकादायक स्थितीत आहे. हा पाचवड-पाचगणी मार्ग नेहमीच वाहनांच्या रहदारीचे व्यस्थ असतो.
काटवली ग्रामस्थांनी सदर पुलाच्या दुरावस्थेची पाहणी करून पूल धोकादायक पुलाची व्यथा निवेदनातून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणून दिली आहे. आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी त्वरित पुलाची पहानी करून दुरुस्ती करिता पाऊले उचलने गरजेचे आहे. अन्यथा पांचगणी मार्गावरील वाहतूक व्यवस्था कोलमडू शकते. या करिता प्रश्‍नाकडे गांभीर्याने पहाण्याची आवश्यकता आहे.

COMMENTS