‘शरद पवार ज्येष्ठ पत्रकार आरोग्य संरक्षण योजना’ सुरु करावी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘शरद पवार ज्येष्ठ पत्रकार आरोग्य संरक्षण योजना’ सुरु करावी

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीची आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे यांच्याकडे मागणी

पुणे । वाढत्या वैद्यकीय खर्चांमुळे राज्यातील ज्येष्ठ व वयोवृद्ध पत्रकारांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर बनत असून अशा पत्रकारांना मदतीचा हात म्हणून शासन

आमदार रोहित पवारांनी दिला मदतीचा हात
माजी नगरसेवक छिंदमविरोधात दोषारोप पत्र दाखल होणार
बंदी असलेल्या सुगंधी तंबाखू साठ्यावर कोतवाली पोलिसांची धाडसी कारवाई

पुणे । वाढत्या वैद्यकीय खर्चांमुळे राज्यातील ज्येष्ठ व वयोवृद्ध पत्रकारांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर बनत असून अशा पत्रकारांना मदतीचा हात म्हणून शासनाने ‘शरद शतम आरोग्य कवच’ योजनेच्या पार्श्‍वभूमीवर पत्रकारांसाठी स्वतंत्र ‘शरद पवार ज्येष्ठ पत्रकार आरोग्य संरक्षण योजना’ सुरु करावी, अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे यांच्याकडे महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्यावतीने करण्यात आली आहे. महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ व कार्यकारी विश्‍वस्त विजय मांडके यांनी ना.राजेश टोपे यांची पुणे येथे समक्ष भेट घेवून त्यांना या मागणीचे सविस्तर निवेदन सादर केले. सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून काही दैनंदिन तपासण्या करायच्या असतील तर त्यांना शासनमान्य रुग्णालयात दाखल असणे बंधनकारक आहे. तथापि रुग्णालयात दाखल न होताही त्यांना शासनमान्य रुग्णालयातून एक दिवसात होतील त्या सर्व प्रकारच्या चाचण्या, तपासणी मोफत मिळावी. तसेच या पत्रकारांना दरमहा लागणारी शासनमान्य रुग्णालयातील डॉक्टर्सनी दिलेली औषधे राज्यात कोठेही शासनमान्य औषध विक्रेत्यांकडून, तसेच तालुका व जिल्हा रुग्णालयातून मोफत मिळावीत.  राज्य शासनाच्या आरोग्य विभागातर्फे महाराष्ट्र शासनाच्या हिरक महोत्सवी वर्षपूर्ती व भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘शरद पवार ज्येष्ठ पत्रकार आरोग्य संरक्षण योजना’ त्वरित सुरु करावी व त्यातून राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांच्या आरोग्य विषयक सर्व मागण्यांची पूर्तता व्हावी. सदर योजनाशरद पवार यांच्या 82 व्या वाढदिवसापासून म्हणजेच 12 डिसेंबर 2022 पासून सुरु व्हावी, अशी अपेक्षाही महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्यावतीने निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, सदर निवेदनावर सकारात्मक प्रतिसाद देताना ना.राजेश टोपे यांनी या सर्व बाबींसाठी आपण लौकरच माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री, आरोग्य व माहिती व जनसंपर्क विभागाचे अधिकारी व महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मंत्रालयात विशेष बैठक आयोजित करु, असे आश्‍वस्त केले.

COMMENTS