महाविद्यालयांचा येत्या शैक्षणिक वर्षात शुल्कवाढ न करण्याचा निर्णय

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाविद्यालयांचा येत्या शैक्षणिक वर्षात शुल्कवाढ न करण्याचा निर्णय

राज्यातील 1 हजार 24 व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांनी येत्या शैक्षणिक वर्षात शुल्कवाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती शुल्क नियामक प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपचे पदाधिकारी आ.जगतापांच्या मागे उभे : अ‍ॅड.अभय आगरकर
 छत्रपती संभाजी नगरच्या उद्योजकांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र
नेपाळची राजधानी काठमांडू येथे मोठी विमान दुर्घटना

पुणे : राज्यातील 1 हजार 24 व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांनी येत्या शैक्षणिक वर्षात शुल्कवाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती शुल्क नियामक प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे करोनामुळे आर्थिक संकटात असलेल्या विद्यार्थ्यांना पुढच्या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणे शक्‍य होणार आहे. 

शुल्क नियामक प्राधिकरणाद्वारे (एफआरए) उच्च व तंत्रशिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आणि कृषी विभागातील अभ्यासक्रमांचे शैक्षणिक शुल्क निश्‍चित केले जाते. त्या अंतर्गत आगामी 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी अभियांत्रिकी, व्यवस्थापन, वास्तुकला, वैद्यकीय, कृषी, विधि अशा विविध पदवी, पदविका, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शुल्क ठरवण्यात आले आहे. त्याची माहिती शुल्क नियामक प्राधिकरणाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक शुल्क 50 हजार ते दोन लाखांपर्यत असते. वैद्यकीय अभ्यासक्रमांचे शुल्क एक लाख ते 10 लाख रुपयांदरम्यान आहे. मात्र शुल्क नियामक प्राधिकरणाच्या नियमानुसार या महाविद्यालयांना दरवर्षी आठ टक्‍क्‍यांपर्यंत शुल्कवाढ करण्यास परवानगी असते. यंदा मात्र शुल्कवाढ न करण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

COMMENTS