अकोले तालुका एज्युकेशन संस्थेची अनागोंदी थांबावीअकोले तालुका एज्युकेशन संस्था बचाव कृती समितीच्यावतीने अकोले तालुका एज्युकेशन संस्थेसमोर धरणे आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. यात आमदार डॉ. किरण लहामटे सहभागी झाले होते.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अकोले तालुका एज्युकेशन संस्थेची अनागोंदी थांबावी

आमदार डॉ. किरण लहामटे यांचे धरणे

अकोले/प्रतिनिधी : अकोले तालुका एज्युकेशन संस्थेची अनागोंदी थांबावी, विश्‍वस्त निवडीतील घराणेशाही थांबवा, संस्थेचे त्रयस्थ यंत्रणेमार्फत ऑडिट करा, अशा

निमगाव वाघात विद्यार्थ्यांनी लावले एक पेड माँ के नाम
राजूरच्या सर्वोदय विद्यालयात सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित
शरद पवारांचे…राष्ट्रवादी पुन्हा ; सत्तांतरानंतर रविवारी नगरला पहिला कार्यकर्ता मेळावा

अकोले/प्रतिनिधी : अकोले तालुका एज्युकेशन संस्थेची अनागोंदी थांबावी, विश्‍वस्त निवडीतील घराणेशाही थांबवा, संस्थेचे त्रयस्थ यंत्रणेमार्फत ऑडिट करा, अशा मागणीसाठी अकोले तालुका एज्युकेशन संस्था बचाव कृती समितीच्यावतीने गुरुवारी अकोले तालुका एज्युकेशन संस्थेसमोर बेमुदत धरणे आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. आमदार डॉ. किरण लहामटे, ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे, डॉ. अजित नवले, ज्येष्ठ नेते दशरथ सावंत विजयराव वाकचौरे, मीनानाथ पांडे, चंद्रकांत सरोदे, सुरेश नवले, विनय सावंत, बी. जे. देशमुख, भानुदास तिकांडे, शांताराम गजे आदी या धरणे आंदोलनात सहभागी झाले आहेत.
आंदोलकांच्या मागण्या जाणून घेण्यासाठी व चर्चा करण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते गिरजाजी बुवा जाधव हे आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी आले असता चर्चेदरम्यान आंदोलक आणि जाधव यांच्यात संघर्ष झाल्याने चर्चा फिस्कटली. यामुळे आंदोलन आणखी तीव्र झाले. यामुळे संतप्त आंदोलकांनी संस्थेचे प्रमुख विश्‍वस्त असलेले माजी मंत्री मधुकरराव पिचड, वैभव पिचड व सीताराम पाटील गायकर हे आंदोलकांशी चर्चेला आल्याशिवाय कोणाशीही चर्चा करायची नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला आणि आंदोलन-धरणे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. आंदोलकांचा अपमान सहन करणार नाही, असे यावेळी डॉ. अजित नवले यांनी सांगितले. आ. डॉ. लहामटे म्हणाले की, तालुक्याच्या हितासाठी शिक्षण संस्था वाचविण्यासाठी आंदोलन सुरू आहे. संस्थेतील घराणेशाही बंद झाली पाहिजे, शिक्षण संस्था राजकारणाचा अड्डा झाली आहे, संस्थेचा राजकीय अड्डा होऊ न देता तालुक्याचे नुकसान थांबवावे यासाठी आंदोलन हाती घेतले. मात्र, हे आंदोलन उधळून लावण्याचा डाव आहे, असे लहामटे म्हणाले व म्हणून आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी अशी माणसे पाठवली असा आरोप त्यांनी केला. मात्र, यामुळे प्रमुख विश्‍वस्त व सर्व विश्‍वस्त चर्चेला आल्याशिवाय चर्चा न करण्यावर आंदोलक ठाम राहिले व आंदोलन सुरूच ठेवल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, चर्चेतून मार्ग न निघाल्यास संस्थेच्या कार्यालयाला दुसर्‍या टप्प्यात टाळे ठोकून त्या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.

COMMENTS