आमदाराच्या ड्रायव्हरकडून एक कोटींची रक्कम हस्तगत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदाराच्या ड्रायव्हरकडून एक कोटींची रक्कम हस्तगत

आमदार के. चंद्रशेखर यांच्या ड्रायव्हरकडे तब्बल एक कोटी रुपयांची रक्कम आढळून आली.

एप्रिलपासून अत्यावश्यक औषधं 10 टक्क्यांनी महागणार | LOKNews24
पाच लाखासांठी महिलेचा सासरी छळ, चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
म्हाडाने घरांसाठी नियम केले शिथील

 त्रिची (तामिळनाडू) : अण्णाद्रमुकचे (एआयडीएमके)

आमदार के. चंद्रशेखर यांच्या ड्रायव्हरकडे तब्बल एक कोटी रुपयांची रक्कम आढळून आली. अलगरासामी असे या वाहनचालकाचे नाव असन इन्कम टॅक्स विभागाने ही रक्कम जप्त केली आहे. वाहन चालकाकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम सापडल्याने खळबळ उडाली आहे. 

तामिळनाडूच्या त्रिची जिल्ह्यातील मनाप्पराई मतदार संघातून चंद्रशेखर हे आमदार आहेत. गेली 10 वर्ष अलगरासामी चंद्रशेखर यांच्याबरोबर काम करतात. आता तिसऱ्यांदा त्यांची एआयडीएमकेचा उमेदवार म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या वालासुपत्ती याठिकाणी थंगपंडी (56) आणि कोट्टाइपट्टी मधील आनंद (32) यांच्या घरावर देखील छापेमारी करण्यात आली. चंद्रशेखर यांच्या अन्य दोन साथीदारांची ही ठिकाणे आहेत. एसपी जयाचंद्रन यांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर यांच्या घराजवळ असणाऱ्या निवासस्थानाजवळ रविवारी 28 मार्चच्या रात्री आयकर विभागाने ही छापेमारी केली होती. कोणतेही कागदपत्र किंवा आवश्यक माहितीशिवाय ठेवण्यात आलेले 1 कोटी रुपये यावेळी जप्त करण्यात आले. अलगरासामीकडे 500 रुपयांच्या नोटांच्या स्वरुपात ही रक्कम जप्त करण्यात आली होती. त्याच्याकडून 500 रुपयांच्या एकूण 20 हजार नोटा जप्त करण्यात आल्या. त्रिची इन्कम टॅक्स सहसंचालक मदन कुमार यांच्या नेतृत्त्वाखाली 3 पथकांनी या तिन्ही साथीदारांच्या घरी छापेपारी केली. इन्कम टॅक्सकडे अशी माहिती आली होती की मतदारांना पैसेवाटप केले जात आहे. अशा काही घटना समोर आल्यानंतर इन्कम टॅक्सने कारवाई करत ही रक्कम जप्त केली.

COMMENTS