अवैधरित्या गोमांस विक्री करणारे आरोपी जेरबंद

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अवैधरित्या गोमांस विक्री करणारे आरोपी जेरबंद

कोपरगाव शहरात अवैद्य रित्या गोमांस विक्री करतांना कोपरगाव शहर पोलिसांच्या वतीने दोन आरोपीना अटक करण्यात आली आहे.

मोहा ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात
भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक l LokNews24
बचतीच्या पैशातून विद्यार्थ्यांकडून दिलेले गणवेश कौतुकास्पद ः मंगेश पाटील

कोपरगाव  शहर प्रतिनिधी- कोपरगाव शहरात अवैद्य रित्या गोमांस विक्री करतांना कोपरगाव शहर पोलिसांच्या वतीने दोन आरोपीना अटक करण्यात आली आहे. 

सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव शहरातील आयशा कॉलनी येथील सार्वजनिक वाचनालय समोरील एका घराच्या कंपाऊंड मध्ये अवैद्य रित्या गोमांस विक्री करतांना अन्सार गफार कुरेशी वय वर्ष ३० व अतिक मुजीब कुरेशी वय वर्ष १९  हे दोघे आयशा कॉलनी मधील  आपल्या घरासमोरील कंपाऊंड मध्ये अवैद्य रित्या उघड्यावर गोमांस विक्री करत असतांना मिळून आले असून त्यांचा विरोधात  कोपरगाव शहर पोलिस कॉन्स्टेबल १५८५ सचिन शेवाळे यांच्या फिर्यादी नुसार गुन्हा रजि नंबर १०१/२०२१ मुबई पोलीस कायदा १०५, महा. प्राणी संर. का. व सुधारणा आधी. क. सुधारणा आधी. क. १९९५ चे कलम ५,९ भादवी ४२९ नुसार गुन्हा दाखल करत आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून या वेळी आरोपींन कडून दहा हजार सातशे रुपये किमतीचा १०७ किलो कत्तल केलेला गोमांस, १०० रुपये किंमतीचा तराजू काटा, २०० रुपये किंमतीचे लोखंडी कोयते, ११५०० रूपये किंमतीचे  तीन वजन मापे असा एकूण २२५०० रुपये चा मुद्देमाल हस्तगत करत आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल १७७७ डी आर तिकोने  हे करत आहे.

COMMENTS