Homeताज्या बातम्या

231 दिव्यांगांना मोफत कृत्रिम हात-पाय वाटप

इस्लामपूर : येथे मोफत कृत्रिम हात-पाय वितरणप्रसंगी प्रा. शामराव पाटील, संजय पाटील, डॉ. प्रकाश म्हाळुंगकर, डॉ. अनिल माळी, मिलिंद जाधव, डॉ. सुशील ढगे,

राज्यातील जनतेला शांतता व संयम राखण्याचे गृहमंत्र्यांचे आवाहन
मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षण लढ्याच्या यशानंतर पाथर्डी शहरासह तालुक्यात  जल्लोष
29 ऑक्टोबर रोजी वधू-वर मेळाव्यास नाव नोंदणी करून उपस्थित रहा-तानाजी बाप्पू जंजिरे

इस्लामपूर / प्रतिनिधी : येथील श्रीमती कुसुमताई पाटील कन्या महाविद्यालयात राज्याचे जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, प्रतिक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 231 दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हात-पाय वाटप करण्यात आले. याप्रसंगी ’आता मी चालू शकतो, दैनंदिन कामे करू शकतो, इतरांच्याप्रमाणे जगू शकतो’ या भावनेने दिव्यांग व्यक्तींच्या डोळ्यात तरळलेल्या आनंदाश्रूंनी वातावरण भारावून गेले. राजारामबापू सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष संजय पाटील, डॉ. प्रकाश म्हाळुंगकर, डॉ. अनिल माळी, मिलिंद जाधव, डॉ. सुशील ढगे, संदीप पाटनी, एस. एन. अग्रवाल, प्राचार्य विलास काळे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
साधू वासवाणी मिशन पुणे, राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी टेक्स्टाईल सिटी, जायंट्स ग्रुप इस्लामपूर पर्ल, वाळवा तालुका राष्ट्रवादी डॉक्टर सेल यांच्या संयुक्त विद्यमाने या कृत्रिम हाता-पायांचे वाटप करण्यात आले. जयंत दारिद्य्र निर्मूलन अभियानाने शिबिराचे संयोजन केले. एक महिन्यांपूर्वी केआरपी कॉलेजमध्ये शिबिर घेऊन वाळवा तालुक्यासह सांगली, सातारा, जत, शिराळा, पुणे, सोलापूर उस्मानाबाद, बुलढाणा, पंढरपूर, बेळगाव, निपाणी, अथणी, देवरुख आदी भागातील दिव्यांग व्यक्तींच्या हाता-पायांची मापे घेतली होती. त्या सर्व दिव्यांगांना हे कृत्रिम हात-पाय, तसेच वॉकर व काठी वाटप करण्यात आले.
साधू वासवाणी मिशनचे डॉ. सुशील ढगे, डॉ. सलील जैन, प्रा. शामराव पाटील, इचलकरंजी येथील रोटरी क्लबचे एस. एन. अग्रवाल, राजेश सुराणा, मोहन राठी, पन्नालाल डालिया, जयंत दारिद्य्र निर्मूलन अभियानचे समन्वयक इलियास पिरजादे इस्लामपूर संघटक राजाराम जाधव, आष्टा संघटक विनायक मुळीक यांच्यासह अभियानच्या कार्यकर्त्यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

COMMENTS