सातारा / प्रतिनिधी : तडीपार आदेशाचा भंग करून सातारा शहरात फिरणार्या अजय देवराम राठोड (वय 29, रा. लक्ष्मी टेकडी, सदरबझार, सातारा) यास सातारा शहर पोलि
सातारा / प्रतिनिधी : तडीपार आदेशाचा भंग करून सातारा शहरात फिरणार्या अजय देवराम राठोड (वय 29, रा. लक्ष्मी टेकडी, सदरबझार, सातारा) यास सातारा शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या राठोडच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरबझारमधील लक्ष्मी टेकडी येथे राहणार्या राठोडच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत. त्यामुळे त्याला तडीपार करण्याचा प्रस्ताव सातारा शहर पोलिसांनी पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे सादर केला होता. त्यानुसार राठोड याला पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी एक वर्षे कालावधीसाठी जिल्ह्यातून तडीपार केले होते.
तडीपार असणारा राठोड हा शहर परिसरात लपूनछपून फिरत होता. त्याची माहिती सातारा शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुधीर मोरे यांना मिळाली. त्यांनी कर्मचारी सुजित भोसले, अविनाश चव्हाण, ज्योतिराम पवार, विक्रम माने, अभय साबळे, संतोष कचरे, विशाल धुमाळ, गणेश भोंग, गणेश घाडगे यांनी राठोडला ताब्यात घेतले. सुजित भोसले यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली असून, सहाय्यक फौजदार पवार तपास करत आहेत.
COMMENTS