म्हसवड / वार्ताहर : शिरतावचे सुपुत्र, देवापूर कॉलेजचे माजी विद्यार्थी प्रा. डॉ. तेजस चंद्रकांत शेंडे यांनी मानाच्या पशू वैद्यकीय क्षेत्रात निली र
म्हसवड / वार्ताहर : शिरतावचे सुपुत्र, देवापूर कॉलेजचे माजी विद्यार्थी प्रा. डॉ. तेजस चंद्रकांत शेंडे यांनी मानाच्या पशू वैद्यकीय क्षेत्रात निली रावी म्हशींच्या संपूर्ण जिनोममधील डीएनए मिथायलेशन भिन्नता आणि विविध जनुक अभिव्यक्ती प्रोफाइल यामधील सहज संबंधाचा अभ्यास करून पिएचडी मिळवली. त्यांना मार्गदर्शक म्हणून डॉ. सिमरजीत कौर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी सन 2018 ते 2021 या कालावधीत गुरू अंगद देव पशु विश्वविद्यालय लुधियाना पंजाब तेथे पदवी प्राप्त केली.
डॉ. तेजस चंद्रकांत शेंडे यांनी त्यांचे पदवी व पदव्युत्तर शिक्षण मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय परेल मुंबई येथे सन 1999 ते 2007 या कालावधीत पूर्ण केले. यानंतर त्यांनी शेट जी. एस. मेडिकल कॉलेज आणि केईएम हॉस्पिटल परेल मुंबई या ठिकाणी स्टेम सेल रिसर्च सेंटरला रिसर्च ऑफिसर या पदावर तीन वर्ष काम पाहिले. सन 2009 ते आजपर्यंत ते क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा या ठिकाणी पशुअनुवंश व पशुपैदास या विभागात सहाय्यक प्राध्यापक या पदावर काम करत आहेत. पशुपालन व्यवसाय मुख्यत्वे शेळी पालन या विषयावर आजपर्यंत जवळपास 4 ते 5 हजार शेतकर्यांना प्रशिक्षण, लेक्चर, कृषि प्रदर्शने, व्यक्तीशः भेट या माध्यमातून माहितीबरोबर प्रत्यक्ष व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत केली.
पशुपालन व्यवसायामध्ये विविध नोंदींचे महत्त्व या महत्त्वाच्या पण दुर्लक्षित विषयावर शेतकर्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे काम केले. याचाच एक भाग म्हणून त्यांनी सकाळ पेपर पुस्तक प्रकाशन विभागाच्या माध्यमातून शेतकर्यांना उपयोगी 4 पुस्तक मराठी भाषेत लिहिली. ऐळी पालन तंत्र आणि व्यवस्थापन हे माहिती पुस्तक, माझ्या शेळ्यांची नोंदवही व माझ्या गाई-म्हशींची नोंदवही ही पशुपालनामधील नोंदीविषयक 2 पुस्तके, शेतीविषयक विविध नोंदी संबंधीचे पुस्तक कृषी दैनंदिनी, महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग आयोजित पशुवैद्यकांसाठी पशुवंशावळ व पशुपैदास या विषयांवर प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. पशुसंवर्धन आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी आयोजित केलेल्या शेळ्या आणि मेंढ्या संबंधित बिल्डिंग पॉलिसीच्या मीटिंगमध्ये मेंबर म्हणूनही काम पाहिले.
महाराष्ट्रातील विविध शेतकर्यांच्या मुलांना पशुवैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी आवश्यक असणार्या नियम, पध्दती याबद्दल याबद्दलची वेगवेगळ्या माध्यमातून तसेच यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून त्यांनी मदत केली. त्यांच्या या कामाची दखल विविध प्रसार माध्यमांनी घेतली आहे. त्यांनी मिळवलेल्या पीएचडीबद्दल जिल्ह्यातील विविध स्तरातून कौतुक होत आहे.
COMMENTS