अहमदनगर/प्रतिनिधी : ख्रिश्चन धर्मगुरू कमलसिंग यांच्यावर राहुरी पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा खोटा असल्याचा दावा शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जग
अहमदनगर/प्रतिनिधी : ख्रिश्चन धर्मगुरू कमलसिंग यांच्यावर राहुरी पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा खोटा असल्याचा दावा शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप व अहमदनगर डिस्ट्रिक्ट रेव्ह. अॅण्ड पास्टर असोसिएशनच्यावतीने करण्यात आला आहे. तसेच ख्रिश्चन धर्मगुरू यांच्यावर खोटा गुन्हा दाखल झालेला मागे घेण्याची मागणी, पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
राजकीय दबावाला बळी पडून धर्मगुरू कमलसिंग यांच्यावर विनयभंग आणि धार्मिक भावना दुखावल्याचा खोटा कथित गुन्हा राहुरी पोलीस स्टेशन या ठिकाणी नोंदविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मागील 7 एप्रिलला दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण करणार्या लोकांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत अहमदनगर जिल्हा रेव्ह. अॅण्ड पास्टर असोसिएशन अहमदनगरच्यावतीने निवेदन दिले होते. परंतु कोणत्याही प्रकारची कारवाई न होता धर्मगुरूंवर कारवाई करण्यात आली, असे असोसिएशनचे म्हणणे आहे. संबंधित महिला मीरा सुभाष हरेल ही प्रार्थना सभेच्या कार्यक्रमात कोठेही आलेली नाही व कधीही चर्चमध्ये आलेली नाही व तिला धर्मगुरू कमलसिंग हे ओळखत सुद्धा नाही, परंतु तिने सर्व काही मनघडण कथित करून खोटा गुन्हा दाखल केला, असा दावा करून अहमदनगर जिल्ह्यातील ख्रिस्ती समाजातील बिशप, रेव्ह. पास्टर आदींसह समाज बांधवांच्यावतीने पोलीस अधीक्षक पाटील यांना निवेदन देऊन या गुन्ह्याची सखोल चौकशी करून, जो खोटा गुन्हा धर्मगुरू कमलसिंग यांच्यावर नोंदविला आहे, तो रद्द करण्यात यावा व तसेच मीरा सुभाष हरेल या महिलेची सखोल चौकशी व्हावी व तिने केलेल्या खोट्या गुन्ह्याबाबत तिच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली. यावेळी अहमदनगर पास्टर असोसिएशन, ख्रिस्ती समाज सेवा समिती, ख्रिस्ती नवनिर्माण सेना, ख्रिस्ती आघाडी अहमदनगर, ख्रिस्ती एकता मंच, ख्रिस्ती समाज सेवा समिती, अल्फा ओमेगा सेवा संघ, ख्रिस्ती अल्पसंख्याक विकास परिषद, ख्रिस्ती सेनाचे पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते.
COMMENTS