मलिकांच्या आठ मालमत्तांवर ‘ईडी’कडून टाच

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मलिकांच्या आठ मालमत्तांवर ‘ईडी’कडून टाच

कुर्ला येथील 3 तर, उस्मानाबादमधील 148 एकर जमिनीचा समावेश

मुंबई/प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते नवाब मलिक सध्या अटकेत असून, त्यांना अजूनही दिलासा मिळालेला नसतांना, बुधवारी ईडीने त्यांच्या एकूण आठ माल

दुकानदाराला चप्पलाने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार
सुधा मूर्तीं यांची राज्यसभेवर निवड
अखेर बंडखोरांच्या तलवारी म्यान

मुंबई/प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते नवाब मलिक सध्या अटकेत असून, त्यांना अजूनही दिलासा मिळालेला नसतांना, बुधवारी ईडीने त्यांच्या एकूण आठ मालमत्ता जप्त केल्यामुळे खळबळ उडाली आहे. कुर्ला पश्‍चिमेमधील व्यावसायिक जागा आणि उस्मानाबादमधील 148 एकर जमिनीचा यात समावेश आहे. नवाब मलिक यांच्यावरील ही कारवाई महाविकास आघाडीसाठी आणखी एक धक्का मानला जात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ईडीकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर, प्रताप सरनाईक, प्राजक्त तनपुरे आणि संजय राऊत यांच्या कोट्यवधींच्या संपत्तीवर टाच आणली होती. तर प्राप्तीकर विभागाने मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांची मालमत्ता जप्त केली होती. नवाब मलिक यांनी आतापर्यंत जामीन मिळवण्यासाठी बर्‍याचदा प्रयत्न केले आहेत. ईडीने आपल्याला केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा त्यांनी केला होता. याविरोधात आता नवाब मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मलिकांनी त्यांच्या अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेत लवकर सुनावणी घेण्याची मागणी केली आहे. मलिकांची ही मागणी मान्य करत सर्वोच्च न्यायालयाने लवकरच सुनावणी घेण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे मलिक यांना दिलासा मिळतो की, नाही ते आगामी काही दिवसांत स्पष्ट होईल. अंमलबजावणी संचालनालयाने दाऊद इब्राहिम मनी लॉन्डिरग प्रकरणात नवाब मलिक यांना अटक केली होती. नवाब मलिक यांच्यावर हसिना पारकर यांच्या मालकीची जमीन खरेदी केल्याचा आरोप असून, त्यांनी 300 कोटींची जमीन केवळ 55 लाखांना खरेदी केल्याचा आरोपही आहे. या संपूर्ण व्यवहारात मलिक यांच्यावर मनी लॉन्डिरगचा आणि अंडरवर्ल्डशी व 1993 बॉम्बस्फोटातील आरोपींशी संबंध असून मालमत्ता खरेदी केल्याचाही आरोप आहे. याशिवाय ईडीने मलिक यांच्यावर टेरर फंडिंगचा आरोप केलेला आहे. दाऊद टोळीकडून अनेकांना धमकावून वादातील मालमत्ता बळकावण्यात आल्या होत्या. त्यातील एक पीडित असलेली मुनीरा प्लंबर यांची कुर्ला येथे तीन एकर जमीन होती. सध्या त्याची किंमत 300 कोटी रुपये आहे. ही जागा मलिक आणि हसिना पारकर यांनी बळकावल्याचा आरोप करण्यात आलेला आहे.

अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
नवाब मलिकांच्या अटकेविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने लवकर सुनावणी घेण्याची मागणी केली होती. मनी लाँड्रिंगशी संबंधित प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर दाखल केलेल्या याचिकेत नवाब मलिक यांनी न्यायालयाकडे तत्काळ सुटकेची मागणी केली आहे. त्यांची ही मागणी मान्य करत, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात येणार आहे. नवाब मलिक यांच्यावतीने कपिल सिब्बल यांनी न्यायालयाकडे या प्रकरणाची लवकर सुनावणी घेण्याची मागणी केली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना या प्रकरणातील कागदपत्रे सादर करण्यास सांगत, सुनावणीसाठी तयारी दर्शवली आहे.

COMMENTS