भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य प्रेरणादायी : राजेंद्र यड्रावकर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य प्रेरणादायी : राजेंद्र यड्रावकर

मुंबई : भारतीय राज्यघटनेने जनतेला मुलभूत अधिकार दिले आहेत. राज्यघटनेवर आधारित भारतीय लोकशाहीस जगभर अनन्यसाधारण महत्व आहे. राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत

सोबत मंत्रिमंडळ घेऊन अयोध्येला जाणे गुवाहाटीला जाणे हे पुरोगामी महाराष्ट्राला न रुचणारे आहे – जयंत पाटील 
इस्त्रोचा आवाज हरपला; काऊंटडाऊन करणाऱ्या शास्त्रज्ञ वलारमती यांचे निधन
शिक्रापुरात एका दिवसात भरला २४७ वाहन चालकांनी दंड

मुंबई : भारतीय राज्यघटनेने जनतेला मुलभूत अधिकार दिले आहेत. राज्यघटनेवर आधारित भारतीय लोकशाहीस जगभर अनन्यसाधारण महत्व आहे. राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य राज्यातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या छायाचित्रांचा माहितीपट तयार करावा,जेणेकरून नवतरूणांना प्रेरणा मिळेल, असे सांस्कृतिक राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांनी सांगितले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिपत्याखालील पुराभिलेख संचालनालयामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनपटावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यमंत्री श्री.यड्रावकर यांनी या प्रदर्शनाची पाहणी केली. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधीत करून जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास पुराभिलेख संचालनालयाचे संचालक सुजीतकुमार उगले, मंत्रालयीन मागासवर्गीय अधिकारी व कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भारत वानखेडे यांच्यासह कर्मचारी आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यमंत्री श्री. यड्रावकर म्हणाले, महात्मा जोतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने समता आठवडा साजरा करण्यात येतो. या समता आठवड्यानिमित्त आणि आझादी का अमृत महोत्सवानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या जीवनपटावर आधारित प्रदर्शन हे सर्वांना प्रेरणा देणारे ठरणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. जगभर भारतीय लोकशाहीला अनन्यसाधारण महत्व असल्याचेही राज्यमंत्री यड्रावकर यांनी सांगितले.

या प्रदर्शनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरू, शैक्षणिक जाणिवा, सामाजिक चळवळ, मन्वंतर पत्रकारितेचे, निवडणूकनामा, स्वतंत्र मजूर पक्ष जाहिरनामा, मतदान पत्रिका, मजूर मंत्री तसेच कायदा मंत्री असताना विविध कामगार आणि नागरिकांना दिलेली भेट, कायदामंत्री म्हणून घेतलेली शपथ, संविधानाचा मसुदा, संसदेत भाषण करतानाचे छायाचित्र, त्यांची स्वाक्षरी, १९१६ ते १९४९ दरम्यान सायमन कमिशन प्रतिनिधींची भेट, लंडन विद्यापीठातील प्राध्यापक सहकारी, राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्यासमवेतची भेट, त्यांचे विचारधन, हस्ताक्षर, पत्रे, निवडक ग्रंथसंपदा, बौद्ध धम्माची दिक्षा देतानाचा सोहळा अशा अनेक ऐतिहासिक घटनांच्या छायाचित्रांचा समावेश या प्रदर्शनात आहे.

COMMENTS