गोदावरी नदीपात्रातून मातुलठाण येथे रात्रीच्या वेळी बेकायदा वाळू उपसा करणा-या तस्करांवर जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील यांच्या आदेशाने कारवाई करण्यात आली.
श्रीरामपूर/प्रतिनिधी : गोदावरी नदीपात्रातून मातुलठाण येथे रात्रीच्या वेळी बेकायदा वाळू उपसा करणा-या तस्करांवर जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील यांच्या आदेशाने कारवाई करण्यात आली. कारवाईत जेसीबी व पोकलेन मशीनसह सुमारे दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पाच आरोपींनाही तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले.
आरोपींमध्ये सुनीलकुमार चुरामन महतो (बेरमो, जि.बोकारो, झारखंड), मनजीत धुप्पड (आनंदवली, नाशिक), अंजनी गौरीशंकर विश्वकर्मा (राजोहा, ता.बहरी, मध्य प्रदेश), युवराजसिंग केशरसिंग भंडारी (बागेसर, डेहराडून) व रवी धुप्पड (श्रीरामपूर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. रविवारी अडीच वाजता ही कारवाई करण्यात आली. आरोपींकडून दोन पोकलेन, एक बुलडोझर, एक ट्रक, दोन जेसीबी व चार ब्रास वाळू, मोबाईल असा एक कोटी ८३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ.दीपाली काळे, पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या आदेशानुसार निरीक्षक मधुकर साळवे यांनी कारवाई केली. पथकामध्ये पोलिस उपनिरीक्षक अतुल बोरसे, हवालदार राजेंद्र आरोळे, सुरेश औटी, दादासाहेब लोंढे, आबासाहेब गोरे, काका मोरे, नितीन चव्हाण, रवींद्र माळी, नितीन शिरसाठ, सुनील शिंदे यांचा पथकात समावेश होता.
COMMENTS