अहमदनगर/प्रतिनिधी : उन्हाचा वाढता कडाका एकीकडे जीवाची लाहीलाही करीत असताना दुसरीकडे आसमंतात आंब्यांचा सुवास जोरात दरवळू लागला आहे. नगरच्या बाजारपेठेत
अहमदनगर/प्रतिनिधी : उन्हाचा वाढता कडाका एकीकडे जीवाची लाहीलाही करीत असताना दुसरीकडे आसमंतात आंब्यांचा सुवास जोरात दरवळू लागला आहे. नगरच्या बाजारपेठेत आंब्यांची आवक वाढली असल्याने भावही कमी होऊ लागले आहेत व आंबा आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात येऊ लागला आहे. सध्या रोज दोन ते तीन ट्रक आंबे नगरला येत असून, नगर शहरासह जिल्हाभरात त्याचे वितरण सुरू झाले आहे. नगरमध्ये केरळ, म्हैसूर, चेन्नई ,बंगलोर येथून आंब्यांची आवक होते. मागील दीड-दोन महिन्यांपासून आंबे बाजारात आले आहेत. पण आवक कमी असल्याने भाव तेजीत होते. पण आता ऊन वाढल्याने आंब्यांची आवकही वाढली आहे. येत्या 10 एप्रिल रोजी श्रीरामनवमी असून अनेक ग्राहक या दिवसांपासून आंबा खाण्यास सुरवात करतात. त्यामुळे आंब्यांची आवक वाढल्याचे नवीपेठेतील स्व.पप्पूशेठ पमनदास आहुजा फळ पेढीचे संचालक अज्जुशेठ आहुजा यांनी सांगितले. गत वर्षीपेक्षा परराज्यातून येणार्या आंब्यांना यंदा थोडासा उशीर झाला. मात्र आता हे आंबे दाखल झाले आहेत. रत्नागिरी, देवगड, लालबागच्या आंब्याचे भाव आता कमी होऊन स्थिरावले आहेत असे जगदीश व कैलास आहुजा यांनी सांगितले. एक नंबर हापूसचा भाव 4 (चार) डझनासाठी तीन ते चार हजार इतका असून या व्यतिरिक्त रत्नागिरी,देवगड हापूस, म्हैसूर लालबाग,पायरी, केशर, लंगडा आदी विविध प्रकारच्या आंब्यांची आवक वाढली आहे, असेही त्यांनी सांगितले.
COMMENTS