HomeUncategorized

भाजपचा कार्यकर्ता मेळावा इंदिरा पॅलेस हॉलमध्ये शनिवारी होणार

इस्लामपूर / प्रतिनिधी : शुक्रवारी अचानक आलेला मोठा पाऊस व गारपिटीमुळे शनिवार, दि. 9 एप्रिल रोजी नानासाहेब महाडीक शैक्षणिक संकुलामध्ये होणारा भव्य

ज्येष्ठ साहित्यिक दि. बा. पाटील यांना रत्नसिंधू जीवन गौरव पुरस्कार जाहीर
जागृत शेतकरी अपप्रचारास बळी पडणार नाही : आ. जयंत पाटील
सातार्‍यात ‘शिवराज्य दरबार स्फूर्तीस्थान’ उभारणार : श्री. छ. वृषालीराजे भोसले

इस्लामपूर / प्रतिनिधी : शुक्रवारी अचानक आलेला मोठा पाऊस व गारपिटीमुळे शनिवार, दि. 9 एप्रिल रोजी नानासाहेब महाडीक शैक्षणिक संकुलामध्ये होणारा भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे ठिकाण बदलण्यात आले आहे. पावसाची दाट शक्यता असल्याने इंदिरा पॅलेसमध्ये होणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष राहुल महाडीक व महाराष्ट्र प्रदेश भाजपा कार्य समिती सदस्य सम्राट महाडीक यांनी दिली. याची सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी नोंद घ्यावी. हा कार्यक्रम नानासाहेब महाडीक शैक्षणीक संकुल जवळ, इंदिरा पॅलेस पेठ-वाघवाडी रोड येथे होईल, असेही महाडीक यांनी कळविले आहे. यावेळी महेश जोशी, कपिल ओसवाल, चेतन शिंदे, सूजित थोरात उपस्थित होते.

COMMENTS