Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कृष्णा बँकेला 15 कोटी 4 लाख रूपयांचा ढोबळ नफा : डॉ. अतुल भोसले

739 कोटींचा एकूण व्यवसायकराड / प्रतिनिधी : ग्रामीण भागातील शेतकर्‍यांची हक्काची बँक समजल्या जाणार्‍या कृष्णा सहकारी बँकेला 31 मार्च 2022 अखेर संप

भाजपला चार राज्यात यश; इस्लामपूरात भाजपाचा जल्लोश
फसवणूक करून हडपलेली जमीन सरकार जमा: प्रांताधिकारी कट्यारे यांचा ऐतिहासिक निकाल
पाटण तालुक्यात गव्याच्या हल्ल्यात वृध्द ठार

739 कोटींचा एकूण व्यवसाय
कराड / प्रतिनिधी : ग्रामीण भागातील शेतकर्‍यांची हक्काची बँक समजल्या जाणार्‍या कृष्णा सहकारी बँकेला 31 मार्च 2022 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात 15 कोटी 4 लाख रूपये इतका ढोबळ नफा प्राप्त झाला आहे. बँकेने या आर्थिक वर्षात 739 कोटी रूपयांचा व्यवसाय टप्पा पूर्ण केला असून, बँकेने पुढील वर्षाअखेर 1000 कोटी रूपयांचे व्यवसाय उद्दिष्ट निश्‍चित केले असल्याची माहिती बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांनी दिली आहे.
याबाबत प्रसिध्दीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे, की सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी यांना केंद्रबिंदू मानून लोकांना बचतीची सवय लागावी व गरजेनुसार कर्ज घेता यावे. यासाठी सहकार महर्षी जयवंतराव भोसले यांनी कृष्णा सहकारी बँकेची स्थापना केली. य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या कृष्णा बँकेच्या 31 मार्च अखेरच्या एकूण ठेवी 488 कोटी 30 लाख रूपयांच्या आहे. 251 कोटी 13 लाख रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. बँकेचा एकूण व्यवसाय 739 कोटींच्या वर झाला. नेट एनपीए शून्य टक्के राहिला आहे. बँकेकडे 70 कोटी 74 लाखांचा स्वनिधी असून, प्रती सेवक व्यवसाय 5 कोटी 73 लाख इतका झाला आहे. सर्व तरतुदी व कर वजा जाता बँकेने 7 कोटी 97 लाख एवढा निव्वळ नफा कमाविला आहे.
गेल्या 2 वर्षांपासून देशात वेगाने फैलावलेल्या कोराना साथीच्या काळातही बँकेने सर्व संचालक मंडळ, सभासद, खातेदार व कर्मचार्‍यांच्या सहकार्याने चांगली कामगिरी करत, व्यवसाय वृध्दीचे उद्दिष्ट गाठण्यात यश मिळविले आहे. बँकेने ग्राहकांच्या सेवेसाठी एटीएम सुविधा, एसएमएस बँकींग, ई-कॉमर्स, आरटीजीएस/ एनईएफटी, एनएसीएच, लॉकर्स यासारख्या अत्याधुनिक सुविधा सुरू केल्या आहेत. तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर व पुणे या 4 जिल्ह्यात 19 शाखांच्या माध्यमातून विनम्र व तत्पर सेवा देणार्‍या या बँकेने सुरू केलेल्या एटीएम सेवेचा लाभ ग्राहकांना होत आहे. बँकेच्या विविध ठेव व कर्ज योजनांचा तसेच अन्य सुविधांचा लाभ लोकांनी घ्यावा, असे आवाहन चेअरमन डॉ. अतुल भोसले यांनी केले आहे.

COMMENTS