Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

किसन वीर साखर कारखान्याच्या निवडणूकीचे वारे; राष्ट्रवादीच्या आमदारासह जिल्हा बँकेच्या अध्यक्षांचा अर्ज बाद

वाई / प्रतिनिधी : वाई तालुक्यातील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आ. मकरंद पाटील व त्यांचे बंधू जिल्हा बँकेचे चेअरम

सोलापुरातील एनटीपीसी केंद्राकडून 525 मेगावॅटची वीजनिर्मिती सुरू
शेतकरी कार्डधारकांना पैसे देण्यात अडचणींचा डोंगर
महात्मा फुले कृषि विद्यापीठात सॉफ्टवेअरचे दोन आठवड्याचे प्रशिक्षण संपन्न

वाई / प्रतिनिधी : वाई तालुक्यातील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आ. मकरंद पाटील व त्यांचे बंधू जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन पाटील यांचे अर्ज बाद झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली. कोरेगाव, सातारा, वाई, बावधन, जावळी, गटात अनेक दिग्गजांचे उमेदवारी अर्ज बाद झाल्याने उमेदवांरानी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना धारेवर धरले. चुकीच्या पध्दतीने अर्ज बाद केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला. दोन्ही अर्ज बाद झाल्याने निवडणूकीच्या आखाड्यातील मजा गेली असल्याचे यावरून दिसून येत आहे.
किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आ. मकरंद पाटील व सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्याची निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे मागणी विरोधकांनी केली होती. आमदारांच्या बाजूने युक्तिवाद करताना वकील म्हणाले, ऊस नोंदविला असताना कारखान्याने उसाची तोड केली नाही. त्यावर्षी 12 लाख टन उसाची नोंद झालेली असताना कारखान्यांने चार लाख टनाचे गाळप केले. व्यवस्थापनाने कारखाना उशिरा सुरु करुन लवकर बंद केला. कारखाना पूर्ण क्षमतेने चालविला नाही. अनेक शेतकर्‍यांचा ऊस न नेता त्यांचे नुकसान केले. यामुळे उमेदवार अर्जावर चुकीच्या पध्दतीने नोंद घेवून अर्ज बाद करण्यात आला आहे. तसेच विरोधकांनी आपली बाजू मांडताना म्हणाले, कारखान्याची निवडणूक लढविण्यासाठी 5 वर्षांमध्ये 3 वर्षे ऊस हा कारखान्याला घालणे आवश्यक आहे. या नियमावर नितीन पाटील यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला आहे. तसेच मोठ्या प्रमाणात सोसायटींनी आमदारांच्या विरोधात हरकत नोंदविली आहे. दोघांचेही अर्ज बाद झाल्याने आज अर्ज बाद होण्याच्या दिवशी प्रशासकीय कार्यालयात एकच गोंधळ उडाला आहे.
राष्ट्रवादीच्या आमदारासह, राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या जिल्हा बँकेच्या अध्यक्षाचा उमेदवारी अर्ज बाद होणे म्हणजे एक नवलच म्हणावे लागले. दोन्ही अर्जदार हे दिवंगत खासदार व किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन लक्ष्मणराव पाटील यांची मुले आहेत. या प्रकारामुळे निवडणूक निर्णय अधिकार्‍यांवर मोठा ताण असल्याचे दिसून येत आहे.

COMMENTS