Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनसे कार्यकर्ता खूनप्रकरणी जळगावच्या पाचजणांना अटक

कोरेगाव / प्रतिनिधी : जळगाव, ता. कोरेगाव येथील वैभव विकास ढाणे यांच्या खूनप्रकरणी गावातीलच पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहि

शहीद जवान रोमित चव्हाण यांना अखेरचा निरोप
हॉटेलमधील रंगपंचमीचा कार्यक्रम पोलिसांनी उधळला
शिरवडेत कृष्णा पात्रात शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू

कोरेगाव / प्रतिनिधी : जळगाव, ता. कोरेगाव येथील वैभव विकास ढाणे यांच्या खूनप्रकरणी गावातीलच पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत पांडुरंग भोसले, सौरभ संजय भोसले, पौर्णिमेश ऊर्फ किरण संजय भोसले, मनोज उत्तम शिडतुरे, रोहन सुभाष भोसले (सर्व रा. जळगाव, ता. कोरेगाव) यांना अटक झाली आहे.
गेल्या वर्षीच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणीच्या गुन्ह्याचा राग मनात धरून संशयितांनी तलवार व कोयत्याचे वार करून वैभव यांचा खून केल्याची फिर्याद शुभम विकास ढाणे (रा. जळगाव, ता. कोरेगाव) यांनी पोलिस ठाण्यात दिली आहे. गुरुवार, दि. 31 रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास जळगाव हद्दीतील भैरोबा मंदिरासमोर प्रशांत पांडुरंग भोसले, सौरभ संजय भोसले, किरण संजय भोसले, हुसेन बेग, मनोज शिरतोडे, रोहन भोसले यांनी बेकायदा जमाव जमवला आणि प्रशांत भोसलेने तलवारीने, तर सौरभ भोसलेने कोयत्यासारख्या हत्याराने वार करून तसेच इतरांनी मारहाण करून वैभव ढाणे याचा खून केला. प्रशांत भोसले व वैभव यांच्यात गावात वाळू काढण्याच्या कारणावरून वाद झाले होते. मागील वर्षी भाऊ वैभव याने चाकूने प्रशांत याच्यावर वार केले होते. त्यात प्रशांत गंभीर जखमी झाला होता.
त्याने दिलेल्या तक्रारीवरून वैभव व त्याच्या मित्रांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. तेंव्हापासून प्रशांत भोसले हा वैभव याच्यावर चिडून होता, असे फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान, याप्रकरणी पौर्णिमेश ऊर्फ किरण भोसले, मनोज शिडतुरे, रोहन भोसले या तिघांना पोलिसांनी दि. 1 रोजी रात्री उशिरा अटक केली. न्यायालयाने या तिघांनाही सहा एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. प्रशांत पांडुरंग भोसले व सौरभ संजय भोसले या दोघांना अटक झाली आहे. त्यामुळे याप्रकरणी अटक केलेल्या संशयितांची संख्या पाच झाली असून पोलीस निरीक्षक सावंत तपास करत आहेत.

COMMENTS